esakal | 'मोदी जगाची शेवटची आशा', आम्ही छापलं नाही - New York Times
sakal

बोलून बातमी शोधा

'मोदी जगाची शेवटची आशा', आम्ही छापलं नाही - न्यूयॉर्क टाइम्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर फोटो छापून त्यांचा गौरव केल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

'मोदी जगाची शेवटची आशा', आम्ही छापलं नाही - न्यूयॉर्क टाइम्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर फोटो छापून त्यांचा गौरव केल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो फेक होता तरीही तो खरा समजून शेअर केला जात होता. अखेर न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत अधिकृत असं स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, आमच्या नावाने प्रसारीत करण्यात येणारी 'नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा' असल्याची बातमी खोटी आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या ट्विटरवरून म्हटले की, ही बातमीसुद्धा त्या खोट्या बातम्यांपैकीच एक आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत न्यूयॉर्क टाइम्सच्या नावाने शेअर केलं जात आहे. तसंच नरेंद्र मोदींसदर्भात आमच्याकडे असलेल्या सर्व अधिकृत अशा बातम्या तुम्ही पुढील लिंकवर पाहू शकता असं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सने एक लिंकसुद्धा शेअर केली आहे.

हेही वाचा: ब्ला.. ब्ला.. ब्ला..; हवामान बदलावरून जगातील नेत्यांवर ग्रेटाचा संताप

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये 'द न्यू यॉर्क टाइम्स' या अमेरिकन वृत्तपत्राचे पहिले पान असल्याचा दावा केला जात होता.रविवार, 26 सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या दैनिकाचे ते पहिले पान असल्याचंही सांगितलं गेलं. तसंच त्यात मोदींच्या छायाचित्रासह "Last, Best Hope of Earth" म्हणजेच जगाची शेवटची आशा आता मोदी आहेत असं लिहिलं होतं.

न्यूयॉर्क टाइम्सने अधिकृतपणे सांगण्याआधीच हा फोटो बनावट असल्याचं समोर आलं होतं. कारण या फोटोमध्ये सप्टेंबरचे स्पेलिंग चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं होतं. तसंच रविवारची २६ सप्टेंबरची न्यूयॉर्क टाइम्सची ई पेपर आवृत्ती पाहिली असतात त्यातही असं काही छापलं नसल्याचं दिसून आलं होतं.

loading image
go to top