अंतराळवीरांसह स्पेसएक्स ड्रॅगन क्रूचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरु.. (व्हिडिओ)

सुशांत जाधव
Sunday, 2 August 2020

अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने ट्वीटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

नासा आणि स्पेसएक्सचे ड्रॅगन क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन पृथ्वीच्या दिशेने रवाना झाले आहे. या यानातून दोन अमेरिकन अंतराळवीर देखील आहेत. नासाने ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ऐतिहासिक क्षणासाठी आम्ही उत्सुक असून यान सुरक्षित पृथ्वीवर पोहचेल, अशी आशाही नासाने व्यक्त केली आहे. स्पेसएक्स के ड्रॅगन कॅप्सूलमधून अमेरिकन अंतराळवीर बॉब बेहकीन (49) आणि डग हर्ली (53) यांनी पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.  स्पेसएक्स आणि नासा 45 वर्षात पहिल्यांदाच अंतराळवीराला थेट समुद्रात उतरण्यात येणार आहे.

पाकिस्तानची बालीशपणाची हद्द; काश्मिर ताब्यात घेण्याचे पाहतोय स्वप्न

अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने ट्वीटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, ड्रॅगन क्रू कॅप्सूल  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या चौहू बाजूने असेलेल्या अप्रोच एलिपसॉइडमधून बाहेर पडले आहे. त्याचा प्रवास सुरक्षितपणे सुरु झाला आहे.  अंतराळवीरांचा पृथ्वीच्या दिशेने सुरु असलेला प्रवासाचे लाइव्ह प्रक्षेपण नासाकडून करण्यात येत आहे. नासाच्या अधिकृत ट्विटरवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. स्पेसएक्स कॅप्सूल ड्रॅगन कॅप्सूल ऑर्बिटच्या समोरच्या बाजूला असून पृथ्वीच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला आहे, असा उल्लेख शेअर केलेल्या व्हिडिओच्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.   

देशात फक्त रिलायन्सलाच 'अच्छे दिन'; जिओच्या नफ्यात 183 टक्क्यांनी वाढ

2011 नंतर अमेरिकेने पहिल्यांदाच मानवरहित मोहीम हाती घेतली आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून 30 मे रोजी या मिशनची सुरुवात झाली होती.  31 मेपासूनच अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होते. या मोहिमेत अनेक प्रयोग करण्यात आले असून हे अमेरिकेसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nasas spacex demo 2 undocks return to earth from international space station