Nepal : माऊंट मनास्लूवर हिमस्खलन; दोन गिर्यारोहकांचा मृत्यू, १० जण अडकले

बारा गिर्यारोहकांचा एक गट या ठिकाणी गिर्यारोहणासाठी गेला होता
Mt Manaslu
Mt Manaslu

काठमांडू : हिमालयाच्या पर्वत रागांमधील माऊंट मनास्लूवर हिमस्खल झालं असून यामध्ये दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर दहा जण अडकले आहेत, बेपत्ता लोकांच्या शोधासाठी बचाव मोहिम राबवण्यात येत आहे, अशी माहिती यासंबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Nepal at least 2 climbers dead many injured in an avalanche at Mt Manaslu)

माऊंट मनास्लूवरील मोहिमेसाठी १२ गिर्यारोहकांचा एक गट गेला होता. या मोहिमेदरम्यान, हिमस्खलन झाल्यानं हे सर्वजण त्यामध्ये अडकले आणि जखमी झाले. यांपैकी तीन जण गंभीर जखमी झाले होते. पण नंतर यातील दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये शेर्मा क्लाईंबर्स, सातोरी अॅडव्हेंचर, इमॅजिन नेपाल ट्रेक्स, इलाइट एक्स्पेडेशन आणि 8 के एक्स्पेडेशन या संघटनांच्या गिर्यारोहकांचा यामध्ये समावेश आहे.

Mt Manaslu
करचोरी प्रकरणी अनिल अंबानींना हायकोर्टाचा दिलासा; 'इन्कम टॅक्स'ला दिले महत्वाचे निर्देश

या मोहिमेत चौथ्या कँपपूर्वीच ही दुर्घटना घडली. दरम्यान, या महिन्यातील २८ ते २९ सप्टेंबरपर्यंत ४०० गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. पण तत्पूर्वीच अशी घटना घडल्यानं सर्वांना धडकी भरली आहे. या मोहिमेतील इमॅजिन नेपाल ट्रेकर्सचा प्रतिनिधी दावा शेर्पा यांनी सांगितलं की, यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com