

Birgunj Violence Erupts After Mosque Vandalism, Curfew Imposed Near India–Nepal Border
esakal
नेपाळच्या दक्षिण भागातील बिरगंज शहरात टिकटॉकवरील एका व्हिडिओने निर्माण केलेल्या तणावाने मोठा हिंसाचार उसळला आहे. हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्याचा दावा करत काही लोकांनी कमला परिसरातील एका मशिदीची तोडफोड केली. या घटनेनंतर शहरात दगडफेक, जाळपोळ आणि रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण बिरगंजमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे.