
Nepal Violence
sakal
काठमांडू: नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनांमुळे देशातील दोन डझनापेक्षा जास्त हॉटेलची तोडफोड झाली असून, नेपाळच्या हॉटेल उद्योगाचे २५ अब्ज नेपाळी रुपयांचे नुकसान झाल आहे. हॉटेलचा विध्वंस, लूटमार, जाळपोळ यांमुळे अनेक हॉटेलचे मोठे नुकसान झाल्याचे ‘हॉटेल असोसिएशन नेपाळ’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले.