नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं विमान सापडलं; क्रॅश झाल्याची लष्कराची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nepal missing tara aircraft with 22 on board including 4 indians found at kowang of mustang

नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं विमान सापडलं; क्रॅश झाल्याची माहिती

नेपाळमधील प्रवाशांनी भरलेल्या बेपत्ता विमानाचा अखेर शोध लागला आहे. हिमालयातील मानापाथीच्या खालच्या भागात हे विमान दिसल्याची माहिती नेपाळ लष्कराने दिली आहे. त्याचवेळी मुस्तांगच्या कोबानमध्ये विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर येत आहे. (nepal missing tara aircraft with 22 on board including 4 indians found at kowang of mustang)

नेपाळमधील एका खाजगी विमान कंपनीचे छोटे प्रवासी विमान रविवारी क्रॅश झाले असून त्यात चार भारतीयांसह २२ जण होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तारा एअरच्या विमानाने पोखरा येथून सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले आणि १५ मिनिटांनी कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. अपघातग्रस्त विमान नंतर कोवांग गावात सापडले. मात्र, विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला, त्यानंतर विमानाचा शोध लागला.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुस्तांगमधील कोबानजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.

हेही वाचा: राणा दाम्पत्य पुन्हा अडचणीत, गुन्हा दाखल

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचे विमान लामचे नदीच्या मुखाजवळ मानपाथी हिमालच्या खालच्या भागात कोसळले. नेपाळ लष्कर हे रस्ता मार्ग आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहे, असे लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले, अशी माहिती ANI ने दिली आहे.

हेही वाचा: Spicejet विमानाच्या विंडशील्डला तडे, मुंबई एअरपोर्टवर त्वरित लँडिंग

Web Title: Nepal Missing Tara Aircraft With 22 On Board Including 4 Indians Found At Kowang Of Mustang

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :nepalplane
go to top