
काठमांडू: नेपाळमधील ‘जनरेशन-झेड’ (Gen-Z) गटांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंसक आंदोलनांमुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटानंतर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी सध्याची संसद विसर्जित केली आहे. तसेच, त्यांनी देशाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम सरकारचे प्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.