
Avishkar Raut
esakal
नेपाळमधील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. भ्रष्टाचाराविरोधात जनरल झेडच्या नेतृत्वाखालील निदर्शनांनी देशात खळबळ उडवली आहे. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे अविश्कार राऊत नावाचा तरुण, ज्याच्या ‘जय नेपाळ’ भाषणाने सहा महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. काठमांडूमध्ये सुरू असलेल्या या हिंसक निदर्शनांनी नेपाळच्या राजकीय संकटाला नवं वळण दिलं आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्याने आणि संसद भवनावर हल्ला होऊन त्याला आग लावण्यात आल्याने देश हादरला आहे.