ब्रिटनला कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची धास्ती ; आणखी सहा देशांमधून विमान उड्डाणांवर बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flight

ब्रिटनने कोरोनाचा नवा व्हेरिअंट समोर आल्यानंतर हा निर्णय़ घेतला आहे. डेल्टा व्हेरिअंटपेक्षा हा विषाणू धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे.

ब्रिटनला कोरोनाची भीती; आणखी सहा देशांमधून विमान उड्डाणांवर बंदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने (United Kingdom) आता आणखी सहा देशांमधून विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ब्रिटनने कोरोनाचा नवा व्हेरिअंट समोर आल्यानंतर हा निर्णय़ घेतला आहे. डेल्टा व्हेरिअंटपेक्षा हा विषाणू धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेत याचे ३० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) सहा देशांमधून उड्डाणे ब्रिटनमध्ये रद्द करण्याची घोषणा आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी केली.

ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेकडून बी १.१.५२९ हा व्हेरिअंटची तपासणी केल्यानंतर त्याला VUI घोषित करण्यात आले. यानंतरच विमान उड्डाणे रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. युकेच्या आरोग्य सुरक्षा संस्थेनं म्हटलं की, या व्हेरिअंटमध्ये मोठ्या संख्येनं स्पाइक प्रोटिन म्युटेशनसह व्हायरल जीनोमच्या इतर भागांमध्ये म्युटेशन आढळून आले. या म्युटेशनची अधिक तपासणी करण्याची गरज आहे. इतर म्युटेशनच्या तुलनेत लस आणि उपचारांनंतरही याच्या संसर्गाचा वेग कमी अधिक असू शकतो.

युकेकडून असंही सांगण्यात आलं आहे की, नव्या म्युटेशनची तपासणी केली जात आहे. याबाबत अजुन काही डेटा मिळवण्याची आवश्यकता आहे. मात्र तरीही आगाऊ काळजी घेतली जात आहे.

ब्रिटनने सध्या आणखी सहा आफ्रिकन देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. त्यांच्यावर ब्रिटनमध्ये विमान उड्डाणांसाठी बंदी घालण्यात येणार असून ब्रिटनच्या प्रवाशांना क्वारंटाइन रहावं लागेल. लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात असून आता हिवाळ्याच्या दिवसात अधिक काळजी घेतली जात असल्याचंही ब्रिटनने म्हटलं आहे.

loading image
go to top