पृथ्वीला मिळाला नवा ‘मिनी चंद्र’

वृत्तसंस्था
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

पृथ्वीला चंद्र किती, असा प्रश्न जर विचारला तर कोणीही याचे उत्तर एक असेच देईल; परंतु कदाचित हे उत्तर काही काळासाठी तरी बदलावे लागणार आहे. कारण, पृथ्वीभोवती फिरणारा दुसरा ‘तात्पुरता’ चंद्र सापडल्याचा दावा आता करण्यात आला आहे. 

वॉशिंग्टन - पृथ्वीला चंद्र किती, असा प्रश्न जर विचारला तर कोणीही याचे उत्तर एक असेच देईल; परंतु कदाचित हे उत्तर काही काळासाठी तरी बदलावे लागणार आहे. कारण, पृथ्वीभोवती फिरणारा दुसरा ‘तात्पुरता’ चंद्र सापडल्याचा दावा आता करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील अॅरेझॉना येथील कॅटालिना स्काय सर्व्हे येथील संशोधकांनी नव्या चंद्राचा शोध लावला आहे. पृथ्वीच्या या दुसऱ्या चंद्राला ‘२०२० सीडी ३’ असे नाव दिले आहे. मागील तीन वर्षांपासून हा अगदी लहानशा आकाराचा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहे.  १५ फेब्रुवारी रोजी येथील संशोधकांना हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसला. याआधीही संशोधकांना हा चंद्र सहा वेळा दिसला होता. त्यामुळे हा पृथ्वीचा मिनी मून असण्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केले. याचा आकार एखाद्या मोटारीएवढा आहे.

“पृथ्वीला एक तात्पुरता चंद्र मिळाला आहे. १५ फेब्रुवारीच्या रात्री मी कॅटालिना स्काय सर्व्हे येथे टेडी प्रुयेनीसोबत काम करत असताना या चंद्राचा शोध लागला,” असे ट्विट खगोल अभ्यासक कॅस्पर विर्झेकोस यांनी केले आहे.

“सूर्यामुळे या मिनी मूनवर काही परिणाम झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. तसेच इतर मोठ्या उपग्रहाद्वारे त्याची काही चित्रे मिळालेली नाहीत,” असे द इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियच्या मीरर प्लॅनेट सेंटरने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

असा आहे नवा चंद्र
    व्यास ६.२ फूट ते ११.५ फुटांच्या दरम्यान
    साधारण तीन वर्षांपूर्वी तो पृथ्वीच्या कक्षेत आला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Mini-Moon Was Found Orbiting Earth