
कॅबिनेटच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत नव्या मंत्र्यांना शपथ
कोलंबो : श्रीलंकेत आथिॅक संकट दिवसेंदिवस गडद होत असून अध्यक्ष गोतबाया राजपक्षे यांनी आपले बंधू बेसिल राजपक्षे यांना अर्थमंत्रिपदावरून हटविले आहे. काल रात्री पंतप्रधान वगळून सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर आज चौघांचा नव्याने शपथविधी करण्यात आला. त्याचवेळी अध्यक्ष गोतबाया यांनी श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचे आवाहन विरोधकांना केले आहे.
अध्यक्ष गोतबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळून सर्व मंत्र्यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांकडे राजीनामे दिले आहेत. देशातील आर्थिक संकटाचा सामना करण्यास अपयशी ठरल्याच्या कारणावरून कॅबिनेटने राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी श्रीलंकेचे केंद्रीय बँकेचे गर्व्हनर अजित निवार्ड काबराल यांनी आज पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा कॅबिनेटच्या सामूहिक राजीनाम्याप्रमाणेच आहे, असे ते म्हणाले. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सामूहिक राजीनाम्यापूर्वी घडलेल्या एका घडामोडीत क्रीडा मंत्री आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे चिरंजीव नमल राजपक्षे यांनी सर्व खात्यांचा राजीनामा दिला त्यानंतर अन्य मंत्र्यांनी राजीनामे देण्याची घोषणा केली.
Web Title: New Ministers Sworn In In Sri Lanka After Cabinet Reshuffle Gotabaya Rajapaksa Mahinda Rajapaksa Colombo
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..