Sri lanka Crisis : नवीन PM ची नियुक्ती लवकरच; श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी केली घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New PM to be appointed in Sri Lanka soon

नवीन PM ची नियुक्ती लवकरच; श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी केली घोषणा

देशात एका आठवड्यात नवीन पंतप्रधान नियुक्त केला जाईल. तसेच नवीन मंत्रिमंडळ देखील तयार केले जाईल. पक्षाचे नेते देशात नवीन सरकार स्थापन करण्यात व्यस्त आहेत, असे देशाला संबोधित करताना श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे म्हणाले. श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राजपक्षे यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे. (New PM to be appointed in Sri Lanka soon)

टीव्हीवर संबोधित करताना राजपक्षे म्हणाले, मी नवा पंतप्रधान (PM) नेमणार आहे आणि मंत्रिमंडळही तयार होणार आहे. आपल्या भाषणात त्यांनी नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचाही उल्लेख केला आणि दंगलखोरांवर कठोर कारवाई केली जाईल. देश सध्या राजकीय आणि आर्थिक संकटाचा सामना करीत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: अनुयायांना लघवी, विष्ठा देणाऱ्या बाबाच्या आश्रमात सापडले ११ मृतदेह

आता सरकार स्थापन करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे अनेकजण सुचवत आहेत. मी यापूर्वीही आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी या सूचनेशी सहमत आहे. जुने मंत्रिमंडळ काढून टाकण्यात आले आहे. आता नवीन मंत्रिमंडळ तयार केले जाईल. ज्यामध्ये तरुणांना प्राधान्य दिले जाईल आणि राजपक्षे नसतील, असेही राष्ट्रपती गोटाबाया महिंदा राजपक्षे म्हणाले.

आंदोलनाला हिंसक वळण

अनेक दिवसांपासून सरकारविरोधात (Sri Lanka) सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. लोक राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करीत आहेत. अनेक ठिकाणी सरकार समर्थक आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचारात एका खासदारासह किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि नौदल तळावर आश्रय घेतला. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: New Pm To Be Appointed In Sri Lanka Soon Announcement By The President

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :presidentSri Lanka
go to top