...तर पाक हा अण्वस्त्रसज्ज दहशतवादी देश बनेल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

पाकिस्तानमधील सरकार हे नाजूक अवस्थेत आहे. ब्रिटीशांनी भारताची फाळणी केल्यापासूनची हीच स्थिती आहे. पाकिस्तानमधील सैन्यामध्येही इस्लामी मूलतत्त्ववादी घुसण्याचा धोका आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेमध्ये याआधीच मूलतत्त्ववादी घुसल्याची शक्‍यता अनेकांनी व्यक्त केली आहे. तेव्हा पाकिस्तानमधील व्यवस्थेचा मूलतत्त्ववाद्यांनी पूर्ण ताबा घेतला; तर ते आव्हान सर्वांत धोकादायक असेल

नवी दिल्ली - ""पाकिस्तानवर जास्त दबाव आणल्यास तेथे अस्थिरता निर्माण होऊन पाकिस्तान हा अण्वस्त्रे असलेला दहशतवादी देश बनेल,'' असा इशारा अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिला आहे.

पाकिस्तानवर जास्तीतजास्त दबाव आणण्यासाठी अमेरिका सध्या प्रयत्नशील आहे. मात्र बोल्टन यांनी याआधी मांडलेल्या भूमिकेमधून ते पाकिस्तानवर कितपत दबाव आणतील, याविषयी आता शंका निर्माण झाल्याचे मानले जात आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रसज्ज देश सध्या इस्लामिक मूलतत्त्ववाद आणि दहशतवादाच्या उंबरठ्यावर आंदोलने घेत असून त्याच्यवर खूप जास्त दबाव आणणे धोक्‍याचे असल्याची भूमिका बोल्टन यांनी एका लेखामधून मांडली होती. या पार्श्‍वभूमीवर नवनियुक्त बोल्टन यांच्या धोरणाचा अंदाज बांधण्यात आला आहे.

""पाकिस्तानवर अधिक दबाव आणावा, अशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. पाकिस्तानवर याआधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पुरेस दबाव आणलाही नव्हता. मात्र पाकिस्तानवर अतिरिक्त दबाव आणणे धोक्‍याचे आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अमेरिकाविरोधी वातावरणाचा मूलतत्त्ववादी व तालिबानलाच फायदा होईल. पाकिस्तानमधील सरकार हे नाजूक अवस्थेत आहे. ब्रिटीशांनी भारताची फाळणी केल्यापासूनची हीच स्थिती आहे. पाकिस्तानमधील सैन्यामध्येही इस्लामी मूलतत्त्ववादी घुसण्याचा धोका आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेमध्ये याआधीच मूलतत्त्ववादी घुसल्याची शक्‍यता अनेकांनी व्यक्त केली आहे. तेव्हा पाकिस्तानमधील व्यवस्थेचा मूलतत्त्ववाद्यांनी पूर्ण ताबा घेतला; तर ते आव्हान सर्वांत धोकादायक असेल. असे झाल्यास केवळ अमेरिका वा युरोपात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठीच पाकिस्तानच्या भूमीचा वापर केला जाईल असे नव्हे; तर पाकिस्तान हाच एक अण्वस्त्रे असलेला दहशतवादी देश बनेल,'' असे बोल्टन यांनी म्हटले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New US National Security Advisor may take the pressure off of Pakistan