
- श्रेया देशमुख
US Visa Rules: अमेरिकेने त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेसंदर्भात एक नवा नियम तयार केला आहे. ज्यामध्ये प्रत्येक परदेशी विद्यार्थ्याला आता नव्या नियमानुसार व्हिसा मिळणार आहे. चला तर मग जाणुन घेऊया नवे नियम...
नव्या दिल्लीत स्थित अमेरिकन दूतावासाने भारतीय विद्यार्थी आणि इतर व्हिसा अर्जदारांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामध्ये सर्व व्हिसा अर्जदारांनी त्यांचे सोशल मिडिया अकाउंट सार्वजनिक करणे आवश्यक आहे. हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या विद्यार्थी व्हिसा स्थगिती प्रक्रियेनंतर घेण्यात आला आहे. ज्यामध्ये व्हिसा अर्जदारांची पार्श्वभूमी तपासली जाईल.