न्यूयॉर्कमध्ये लागली मृतदेहांची रांग; व्हिडिओ व्हायरल...

new york the dead bodies are buried together a video with a fork came in front
new york the dead bodies are buried together a video with a fork came in front

न्यूयॉर्क (अमेरिका): जगभरात कोरोना व्हायसने धुमाकूळ घातला असताना याचा फटका आता अमेरिकेला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. न्यूयॉर्कमध्ये दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढू लागली असून, रांग लागली आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

चीनमधून व्हायरल झालेल्या कोरोनाचा फटका इटली, स्पेननंतर अमेरिकेला बसू लागला आहे. एका दिवसात तब्बल 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून, मृतदेहांची रांग लागली आहे. या मृतदेहांना एकत्रित दफन केले जात आहे. संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 7 हजारांहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. गुरुवारी (ता. 9) कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10000 ने वाढली आणि हा आकडा 1 लाख 60 हजारांपर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 16500 लोकांचा मृत्यू झाला असून, 4 लाख 62 कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

'बीबीसी'ने दिलेल्या वृत्तानुसार, हार्ट ट्विपन येथे अशा लोकांना दफन केले जात आहे. येथे मोठ-मोठे कब्र खोदले जात आहे. यापूर्वी येथे आठवड्यात फक्त एकदाच कब्र खोदली जात होती. पण, आता आठवड्यातील पाचही दिवस कब्र खोदण्याचे काम सुरू आहे. कब्र खोदण्यासाठी बाहेरुन कॉन्ट्रॅक्टर बोलवले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com