इंटरनेट यूजर्सची संख्या चार अब्जांहून अधिक

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

न्यूयॉर्क : साडेसात अब्जांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या जगामधील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या चार अब्जांहून अधिक झाली आहे. म्हणजेच जगातील जवळपास साठ टक्के जनता "ऑनलाइन' असते. 2017 या एकाच वर्षात तीस ते पस्तीस लाख लोकांनी प्रथमच इंटरनेटचा वापर सुरू केल्याचे "वुई आर सोशल' आणि "हूटसूट' या संस्थांनी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

इंटरनेटचा वापर वाढण्याची कारणे :
- परवडणारे स्मार्ट फोन
- वाढत्या स्पर्धेमुळे मोबाईल कंपन्यांकडून स्वस्तात इंटरनेट
- तरुणांचा सोशल मीडियाकडे वाढता ओढा
- विविध महत्त्वाच्या कारणांसाठीही सोशल मीडियाचा वाढता वापर

जगभरातील इंटरनेटचे "जाळे'
7.5 अब्ज : जगाची लोकसंख्या
10 लाख : दररोज वाढणारे यूजर्स
3 अब्ज : सोशल मीडियाचा वापर करणारे
4 अब्ज : इंटरनेट यूजर्स (गेल्या वर्षीपेक्षा 7 टक्‍क्‍यांनी वाढ)
5 अब्ज : मोबाईल फोन असणारे

इंटरनेट यूजर्सची केवळ संख्याच वाढली नसून, इंटरनेटवर व्यतित होणारा वेळही वाढला आहे. जगातील सर्व इंटरनेट यूजर्सने इंटरनेटवर घालविलेला वेळ एकत्र केला, तर एक अब्ज वर्षे इतका कालावधी होतो. एक जण दररोज सरासरी सहा तास इंटरनेटचा वापर करतो, असे दिसून आले आहे. थायलंड या यादीत आघाडीवर असून, येथील लोक दररोज सरासरी 9 तास इंटरनेट वापरतात.

इंटरनेटवर व्यतित होणारा वेळ
9.38 तास : थायलंड
9.14 तास : ब्राझील
8.32 तास : दक्षिण आफ्रिका
7.25 तास : भारत
6.30 तास : चीन
6.30 तास : अमेरिका
5.51 तास : ब्रिटन
4.12 तास : जपान

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new york news internet users increase