Video: ओह नो! विमानावर वीज कोसळली...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

विमानावर वीज कोसळल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, संबंधित घटना पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वीज पडत असताना एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केले आहे.

क्राइस्टचर्च (न्यूझीलंड): विमानावर वीज कोसळल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, संबंधित घटना पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वीज पडत असताना एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केले आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडला वादळाचा तडाखा बसत असून, याचा फटका विमानसेवेलाही बसत आहे. क्राइस्टचर्च येथे विमानतळावर विमान थांबले असताना प्रवासी वेटिंगरुममध्ये बसले होते. बाहेर विजा चमकत होत्या. यावेळी एक प्रवासी छायाचित्र काढत होता. एमिरेट्स A-380 विमानावर वीज पडत असतानाची घटना कॅमेऱयात कैद झाली. पण, विमानवर वीज न कोसळता बाजूला कोसळली. मात्र, छायाचित्रामध्ये विमानावर कोसळत असल्याचे भासत आहे.

डॅनियल करी नावाच्या तरुणाने संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करताना अंगावर काटा आणणारे छायाचित्र असल्याचे म्हटले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 1500 हून अधिकवेळा वीजांचा कडकडाट झाल्याची माहिती समोर आली आहे. विविध ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय, क्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळालाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new zealand airport lightning strikes near emirates plane