हा देश झाला कोरोनमुक्त; कोणता ते वाचा

पीटीआय
Tuesday, 9 June 2020

मुलीबरोबर थोडे नृत्य
देश कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळताच आनंदाच्या भरात मुलगी निवी हिच्या साथीत घराच्या हॉलमध्ये थोडे नृत्य केले, असे जेसिंडा यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले. दोन वर्षांच्या निवीलाही आश्‍चर्य वाटले. मी का नृत्य करतेय याची तिला अजिबात कल्पना नव्हती; पण तिने मला साथ दिली, असे जेसिंडा म्हणाल्या.

वेलिंग्टन - न्यूझीलंडमधील अखेरचा कोरोनारुग्ण बरा झाला असल्याने हा देश सध्या तरी कोरोनामुक्त झाल्याचे येथील आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. सरकारच्या या घोषणेमुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, यामुळे स्टेडियम, म्युझिक कॉन्सर्ट पुन्हा एकदा गजबजणार आहेत.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

न्यूझीलंड-मध्ये १७ दिवसांपूर्वी पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी  स्पष्ट केले की,  सरकार गाफिल राहणार नसून यापुढेही संसर्ग न पसरण्यासाठी सर्व प्रकारे काळजी घेऊ. परदेशातून आलेल्यांमुळे  फैलाव झाला होता. सध्या आंतरराष्ट्रीय सीमा विदेशी नागरिकांसाठी बंद आहेत.

मुलीबरोबर थोडे नृत्य
देश कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळताच आनंदाच्या भरात मुलगी निवी हिच्या साथीत घराच्या हॉलमध्ये थोडे नृत्य केले, असे जेसिंडा यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले. दोन वर्षांच्या निवीलाही आश्‍चर्य वाटले. मी का नृत्य करतेय याची तिला अजिबात कल्पना नव्हती; पण तिने मला साथ दिली, असे जेसिंडा म्हणाल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new zealand country coronafree