

इच्छा मृत्यूला परवानगी असलेल्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मृत्यू स्वीकारला जातो. तर काही ठिकाणी परवानगी असली तरी असा मृत्यू बेकायदेशीर मानला गेला आहे.
इच्छा मृत्यूची मागणी करणारी अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. यातच जगातील असेही काही देश आहेत जिथं आधीपासून अधिकृतपणे इच्छा मृत्यूला परवानगी आहे. यात आणखी एका देशाचा समावेश झाला आहे. न्यूझीलंडने आजपासून इच्छा मृत्यूचा कायदा लागू केला आहे. याआधी स्वीत्झर्लंड, नेदरलँड, स्पेन, बेल्जियम, लग्जमबर्ग, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया या ठिकाणी इच्छा मृत्यू कायदा आहे. कायद्यानुसार या इच्छा मृत्यू म्हणजे एखादा गंभीर आजार किंवा ज्याच्यावर उपचार नाही अशा व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला संबंधित त्रासातून मुक्त करणे. त्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने इच्छा मृत्यू दिला जातो. युथनेशिया (Euthanasia) असंही इच्छा मृत्यूला म्हटलं जातं. हा ग्रीक शब्द असून यामध्ये Eu म्हणजे चांगली आणि Thantos म्हणजे मृत्यू असा अर्थ दडलेला आहे. याला मर्सी किलिंग असंही म्हणतात.
न्यूझीलंडने इच्छा मृत्यूचा कायदा तयार करताना त्यात म्हटलं आहे की, एखाद्याला दुर्धर असा आजार असेल आणि त्याचा मृत्यू सहा महिन्यात होणार असेल तर संबंधित व्यक्तीला इच्छा मृत्यूची मागणी करता येईल. तसंच कोणत्याही व्यक्तीला इच्छा मृत्यूच्या परवानगीसाठी किमान दोन डॉक्टरांची परवानगी आवश्यक आहे. न्यूझीलंडमध्ये इच्छा मृत्यूचा कायदा लागू करण्यासाठी लोकांची मते घेण्यात आली होती. यात नागरिकांनी इच्छा मृत्यूच्या बाजूने ६५ टक्के मतदान केलं.
भारतात इच्छा मृत्यू किंवा दया मृत्यू या दोन्ही अवैध गोष्टी आहे. भारतीय दंडविधान कलम ३०९ अंतर्गत हा आत्महत्येचा गुन्हा आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने निष्क्रिय इच्छा मृत्यूला परवानगी दिली आहे. निष्क्रिय इच्छा मृत्यू म्हणजे एखाद्या दुर्धर अशा आजाराने ग्रस्त व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो आणि औषधोपचार केले तरी त्याने फारसा फरक पडणार नाही अशावेळी उपचार बंद केले जातात. इच्छा मृत्यूला परवानगी असलेल्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मृत्यू स्वीकारला जातो. तर काही ठिकाणी परवानगी असली तरी असा मृत्यू बेकायदेशीर मानला गेला आहे.
अमेरिकेत इच्छा मृत्यू बेकायदेशीर आहे. मात्र ओरेगन, वॉशिंग्टन, मोंटाना राज्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा मदतीने इच्छा मृत्यूला परवानगी आहे. स्वीत्झर्लंडमध्ये विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या करण्याची परवानगी आहे. मात्र याला कायदेशीर आधार नाही. इच्छा मृत्यू बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. नेदरलँडमध्ये मात्र डॉक्टरांच्या मदतीने इच्छा मृत्यू स्वीकारल्यास किंवा रुग्णाला त्याच्या परवानगीने देण्यात आलेला मृत्यू हा गुन्हा मानला जात नाही. बेल्जियममध्ये २००२ पासून इच्छा मृत्यूला परवानगी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.