
जेसिंडा आर्डर्न यांनी त्यांच्या कृतीतून स्पष्ट संदेश दिला आहे की, सरकारने केलेले नियम हे फक्त जनतेसाठी नाहीत तर नेत्यांसाठीसुद्धा आहेत.
नियम सर्वांना सेम! न्यूझीलंडच्या PM जेसिंडा यांनी स्वत:चं लग्न ढकललं पुढे
वेलिंग्टन - न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न (Jecinda Ardern) यांनी त्यांचं स्वत:चं लग्न पुढे ढकललं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडमध्ये (New Zealand) कोरोनाची आणखी एक लाट आली आहे. त्यामुळे देशात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या (Corona) नियमांचे पालन करत पंतप्रधान जेसिंडा यांनी आपले लग्न स्थगित करण्याचं ठरवलं आहे. जेसिंडा आर्डर्न यांनी त्यांच्या कृतीतून स्पष्ट संदेश दिला आहे की, सरकारने केलेले नियम हे फक्त जनतेसाठी नाहीत तर नेत्यांसाठीसुद्धा आहेत.
पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी लग्न पुढे ढकलल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांनी नवी तारीख सांगितलेली नाही. जेसिंडा आर्डर्न यांनी क्लार्क गेफोर्ड यांच्याशी लग्न करणार आहेत. दीर्घकाळापासून दोघेही एकत्र राहत असून क्लार्क गेफोर्ड हे फिशिंग शोचे होस्ट आहेत.
आर्डर्न आणि गेफोर्ड यांना लहान मुलगी असून नेव असं तिचं नाव आहे. एका देशाच्या पंतप्रधानपदी असताना आई बनललेल्या आर्डर्न या दुसऱ्या नेत्या बनल्या होत्या. देशाचं पंतप्रधान पद सांभाळताना त्यांना मुलीकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे गेफोर्ड हेच मुलीची काळजी घेतात.
हेही वाचा: "Surrogacy ने मुल मिळवणाऱ्या मातांना खरंच..."; तस्लीमा नसरीन यांचा सवाल
न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क बंधनकारक कऱण्यात आला आहे. तसंच गर्दी करण्यास मनाई आहे. एका लग्नात आलेल्या पाहुण्यांमुळे कोरोनाचा संसर्ग पसरल्यानं हा निर्णय घेण्यात आला. एका कुटुंबातील काही सदस्य आणि ते ज्या विमानाने आले होते त्यातील फ्लाइट अटेंडेंटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली होती.
Web Title: New Zealand Pm Jacinda Ardern Cancels Her Wedding Amid New Omicron Restrictions
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..