New Zealand MP : 'माझ्या मतदारांसाठी जीवही देईल..'; न्यूझीलंडच्या संसदेत तरुणीचं 'माओरी'मधील खणखणीत भाषण व्हायरल

Maori Speech : न्यूझीलंडच्या एओटेरोवा मतदारसंघातून निवडून येत हाना 1853 नंतरची सर्वात तरुण खासदार ठरली.
New Zealand MP Speech
New Zealand MP SpeecheSakal

New Zealand MP Speech Video : न्यूझीलंडच्या 170 वर्षांच्या इतिहासातील सर्वात तरुण खासदार असणाऱ्या तरुणीचं संसदेतील भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या अवघ्या 21 वर्षांच्या तरुणीने आपल्या माओरी भाषेमध्ये केलेल्या खणखणीत भाषणाची चर्चा अवघ्या जगभरात सुरू आहे. हाना रावहिती मैपी क्लार्क (Hana-Rawhiti Maipi-Clarke) असं या तरुणीचं नाव आहे.

हाना ही तरुणी न्यूझीलंडमधील मूळनिवासी असणाऱ्या माओरी या जमातीची प्रतिनिधी आहे. हानाने आपल्या भाषणामध्ये आपल्या मतदारांना एक अनोखं प्रॉमिस केलं. "मी तुमच्यासाठी स्वतःचा जीवही देऊ शकते.. मात्र तुमच्यासाठीच मी जिवंत राहणार आहे." विशेष म्हणजे हे भाषण तिने आपली मातृभाषा 'माओरी'मध्येच केलं. (New Zealand MP Maori Speech)

न्यूझीलंडच्या एओटेरोवा मतदारसंघातून निवडून येत हाना 1853 नंतरची सर्वात तरुण खासदार ठरली. तिने 2008 सालापासून याठिकाणी जिंकत आलेल्या नानाइया नावाच्या उमेदवाराला पराभूत करून नवा इतिहास रचला होता. (New Zealand Youngest MP)

New Zealand MP Speech
China Bizarre : एक नव्हे, दोन्ही पाय पोहोचले होते थडग्यात; अन् सहा दिवसांनी 'ती' झाली जिवंत! चीनमधील अजब प्रकार

माओरी भाषेसाठी लढा

न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, हाना ही न्यूझीलंडमधील मूळनिवासी नागरिकांच्या अधिकारांसाठी लढत आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंड आणि हॅमिल्टन शहरांच्या मध्ये असणाऱ्या हंटले नावाच्या छोट्याशा तांड्यावर ती राहते. याठिकाणी ती माओरी जमातीच्या लहान मुलांसाठी किंडागार्डन चालवते. ती स्वतःला राजकीय नेता नाही, तर माओरी (Maori Language) भाषेची संरक्षक म्हणवते. माओरी लोकांच्या नव्या पिढीचं म्हणणं सगळ्यांनी ऐकण्याची गरज असल्याचं हाना म्हणते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com