Year Ender 2022 : रशिया-युक्रेन युद्ध ते श्रीलंका संकट; वाचा महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घटना

news year ender 2022 top international events year 2022 russia ukraine war Masha Amini Death sri lanka economic crisis Nupur Sharma
news year ender 2022 top international events year 2022 russia ukraine war Masha Amini Death sri lanka economic crisis Nupur Sharma

Year Ender 2022 : 2022 हे वर्षं संपत आलं आहे, या वर्षभरात जगातील विविध देशांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली. राजकीय-सामाजीक जगतात मोठे उलटफेर करणाऱ्या या घटनांचे पडसाद जगभर पाहायला मिळाले. युक्रेन-रशिया युध्दात हाजारो लोक मारले गेले, तेवढेच विस्थापित झाले. ब्रिटनमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली तर भारताचा शेजारी श्रीलंका एका मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे गेला. अशाच काही मोजक्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. चला तर मग सरत्या वर्षात आंतराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या काही महत्वाच्या घटनांबद्दल जाणून घेऊया...

श्रीलंका आर्थिक संकट-

गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत एप्रिल-मे महिन्यात हिंसक निदर्शने सुरू झाली. खाण्यापिण्याच्या आणि डिझेल-पेट्रोलसारख्या गोष्टींसाठी दैनंदीन वस्तूंसाठी लोकांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या घरांवर हल्ला केला. याचा परिणाम असा झाला की महिंदा राजपक्षे आणि गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून पळून जावे लागले. नंतर राजकीय अस्थिरता संपुष्टात आली आणि दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे पंतप्रधान झाले.

याशिवाय रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती बनले आहेत. या वर्षाच्या मध्यात श्रीलंका त्याच्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत होता. श्रीलंकेत इंधन, औषधे आणि अन्नपदार्थांची कमतरता आणि सरकारी भ्रष्टाचार यामुळे श्रीलंकेत गृहयुद्धासारखी परिस्थिती असताना भारताने पुढे पाऊल टाकत शेजारील देशाला शक्य ती सर्व मदत पाठवली.

news year ender 2022 top international events year 2022 russia ukraine war Masha Amini Death sri lanka economic crisis Nupur Sharma
Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

नुपूर शर्मा वाद-

राजकीय क्षेत्राशी संबंधित नुपूर शर्मा या वर्षी खूप चर्चेत होती.ती भारतीय जनता पक्षाची माजी प्रवक्ता होती. एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर देशातील अनेक भागात हिंसाचार झाला आणि नुपूर मुस्लिम संघटना आणि कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर आली.

या वादग्रस्त विधानाचे देशातच नाही तर संपूर्ण जगात खळबळ उडाली.नुपूर शर्माच्या अटकेसाठी देशभरात हिंसक निदर्शने देखील झाली. सौदी अरेबिया आणि कतारसह सर्व मुस्लिम देशांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.त्याचवेळी नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानामुळे भाजपने तिची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

'द काश्मीर फाइल्स'वरून वाद -

काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे वर्णन करणारा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 11 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झालेल्या या चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले.या चित्रपटावर बरेच वाद झाले असले तरी. विरोधकांसह एका मोठ्या वर्गाने या चित्रपटाला अपप्रचार म्हणत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. यानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे विक्रम मोडीत काढले.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्युरी प्रमुख (IFFI-2022) नादव लॅपिड (Nadav lapid) यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर वादग्रस्त विधान केल्याने चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला.

महसा अमिनीचा मृत्यू-

इराणमधील एक मुलगी जी तिच्या मृत्यूनंतर देशाची हिरो बनली आहे. तिच्या समर्थनात देशभरातील महिला रस्त्यावर उतरल्या. ती मुलगी म्हणजेच महसा अमिनी.महिलांसाठीच्या ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या महसा अमिनी या तरुणी 16 सप्टेंबर रोजी कोठडीत मृत्यू झाला.यानंतर इराणमध्ये प्रचंड निदर्शने होऊन जगभरात याची दखल घेण्यात आली.

तीच्या मृत्यूचा निषेध व्यक्त करण्यासाठी महिलांनी त्यांचे केस कापले आणि कॅमेऱ्यासमोर त्यांचे हिजाब जाळून टाकले. इराणमध्ये गेल्या काही वर्षांत महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी जोरदार निदर्शने केली आहेत.दरम्यान इराणमध्ये सध्या आंदोलकांचा छळ सुरूच आहे.

news year ender 2022 top international events year 2022 russia ukraine war Masha Amini Death sri lanka economic crisis Nupur Sharma
Year Enders 2022 : हिजाब, सत्तासंघर्ष ते '35 तुकडे'; वर्षभरातील गाजलेले मुद्दे एका क्लिकवर

रशिया-युक्रेन युद्ध-

रशिया- युक्रेन युध्द या प्रश्नाची चर्चा जगभर चालू होती. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला जवळपुास एक वर्ष पूर्ण होत आहे, पण त्यावर कोणताही तोडगा निघतान दिसत नाही. या युद्धाची सुरुवात रशियन सैन्याने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण करून केली. या युध्दात आतापर्यंत युक्रेनमध्ये हजारो लोक मारले गेले आणि लाखो विस्थापित झाले आहेत.

युध्द सुरू झालयानंतर हजारो भारतीयांना युक्रेन सोडून भारतात परत यावं लागलं, यामध्ये मेडिकल विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. परंतु रशियाने आपल्या सैन्याने नागरिकांना लक्ष्य केल्याचा इन्कार केला आहे.दरम्यान या युध्दाचा जगतीक राजकारणावर प्रभाव पडला.

यूएस गर्भपात नियम-

अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रद्द केला आहे.असे करून,न्यायालयाने स्वतःचा पाच दशके जुना ऐतिहासिक निर्णय बदलला आहे. या निर्णयामध्ये् महिलांना गर्भपात करण्यासाठी कायदेशीर दर्जा देण्यात आला होता. हा निर्ण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 1973 साली दिला होता, त्यामुळे आपण भविष्याकडे वाटचाल करतोय की आपली पावली ही मागेच पडताय अशी चर्चा जगभर सुरू झाली.

अनेक प्रयत्नांनंतर अमेरिकेतील महिलांना सुरक्षित गर्भपाताचा अधिकार मिळाला. मात्र आता इतक्या वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला तोच निर्णय रद्द केल्याने देशातील वातावरण तापलं.

news year ender 2022 top international events year 2022 russia ukraine war Masha Amini Death sri lanka economic crisis Nupur Sharma
Year Ender 2022 : OTT वर खूप काही पाहण्यासारखे होते, आपले लक्ष होते कुठे?

ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी-

ब्रिटनमध्ये सरकारच्या मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या विरोधात बंड केले.अर्थव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि इतर आरोपांमुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव वाढला, त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बोरिस जॉन्सन यांच्या जागी लिझ ट्रस ब्रिटनचे नव्या पंतप्रधान झाल्आ. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने लिझ ट्रस यांना परिस्थिती हाताळता आली नाही आणि त्यांनीही राजीनामा दिला.यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com