प्रियकर 'हेल्थ बॅण्ड'मुळे नको त्या अवस्थेत सापडला...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 डिसेंबर 2019

प्रियकरावर जीवापेक्षा जास्त प्रेम करत होते. प्रियकराने मला एक भेटवस्तू दिली होती. पण, या भेटवस्तूमुळेच तो रंगेहाथ पकडला गेला आणि मला फसवत असल्याचे समोर आले. एका प्रेसयीने ट्विट करून आपली व्यथा मांडली आहे.

न्यूयॉर्क: प्रियकरावर जीवापेक्षा जास्त प्रेम करत होते. प्रियकराने मला एक भेटवस्तू दिली होती. पण, या भेटवस्तूमुळेच तो रंगेहाथ पकडला गेला आणि मला फसवत असल्याचे समोर आले. एका प्रेसयीने ट्विट करून आपली व्यथा मांडली आहे.

'हेल्थ बॅण्ड' आरोग्याशी निगडीत असल्यामुळे अनेकजण वापर करताना दिसतात. मात्र, 'हेल्थ बॅण्ड'मुळे प्रियकर दुसऱया मुलीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडला गेल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेतील महिला पत्रकाराच्या बाबतीत ही घटना घडली आहे.

अमेरिकेतील क्रीडा पत्रकार असणाऱ्या जेनी सॅल्टर (वय 38) हिने स्वत:च हा अनुभव ट्विटवरुन शेअर केला आहे. तिने म्हटले आहे की, 'माझ्या प्रियकराने एकदा मला नाताळानिमित्त फिटबीट भेट म्हणून दिले होते. मला ते खूप आवडलं. व्यायाम करण्याबरोबरच एकमेकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आम्ही ते एकमेकांच्या डिव्हाइसशी सिंक्रो करुन घेतले होते. मात्र, अचानक एका रात्री पहाटे चारच्या सुमारास माझ्या प्रियकराची शारीरिक हलचाल वाढल्याचे नोटीफिकेशन माझ्या मोबाईलवर आले. प्रियकराचे एवढी शारीरिक हालचाल वाढल्यामुळे मला काळजी वाटली. पण, खरी परिस्थिती जाणून घेतली तेंव्हा मोठा धक्का बसला. माझा प्रियकर दुसऱया मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याची खरी माहिती समजली. माझा प्रियकर मला फसवत होता पण या 'हेल्थ बॅण्ड'मुळे खरी माहिती पुढे आली.'

जेनीने ट्विट करून आपली व्यथा जगासमोर मांडल्यानंतर 46 हजारांहून अधिक लोकांनी ट्विट लाईक केले आहे तर 4.72 लाखांहून अधिक जणांनी ट्विटला लाईक केले आहे. जेनी ट्विटमुळे चर्चेत आली आहे. तिच्या ट्विटवरही अनेकांनी वेगवेगळ्या अनुभवांचे रिप्लाय दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nfl correspondent caught ex cheating on her because of activity on his fitbit