esakal | Airplane Crash: विमान अपघातात स्वीडनमध्ये 9 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Swedish airplane crash

स्वीडनमधील विमान अपघातात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. 9 जणांना घेऊन जाणारे विमान ओरेब्रोच्या बाहेरील भागात कोसळले. यामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

विमान अपघातात स्वीडनमध्ये 9 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

स्टॉकहोम Swedish airplane crash- स्वीडनमधील विमान अपघातात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. 9 जणांना घेऊन जाणारे विमान ओरेब्रोच्या बाहेरील भागात कोसळले. यामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. स्वीडन पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. हा खूप भयानक अपघात होता. विमानातील सर्वांचा जागीच मृत्यू झाला, असं स्वीडन पोलिसांनी सांगितलं. Reuters ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Nine found dead in Swedish airplane crash)

पोलिसांनी सांगितल्यानुसार, 'DHC-2 Turbo Beaver विमानात 8 स्कायडायव्हर्स आणि 1 वैमानिक स्वार होते. ओरेब्रो विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमानाने उड्डाण केले. त्यानंतर लगेचच विमानाला आग लागली होती. ' स्वीडनचे पंतप्रधान स्टिफन लोफवेन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ओरेब्रो येथे विमान अपघात झाल्याची बातमी मला कळाली. या घटनेमुळे मला अत्यंत दु:ख झाले आहे. माझ्या भावना सर्व पीडितांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अशाच प्रकारच्या एका अपघातात उत्तर स्वीडनमध्ये 2019 मध्ये 9 स्कायडायव्हर्सचा मृत्यू झाला होता. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याचा अपघात झाला होता. विमानात जास्तीचे वजन भरण्यात आल्याचे तपासातून समोर आले होते. DHC-2 Turbo Beaver चा अपघात कशामुळे याचा तपास केला जाणार आहे.

loading image