इम्रान खान यांच्यावरील अविश्‍वास ठराव स्थगित; सत्ता बचावाची धडपड सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm imran khan

इम्रान खान यांच्यावरील अविश्‍वास ठराव स्थगित; सत्ता बचावाची धडपड सुरू


इस्लामाबाद : एका खासदाराचा मृत्यू झाल्याने आज नॅशनल असेंब्लीचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आता अविश्‍वास ठराव येत्या २८ मार्चला म्हणजेच सोमवारी मांडण्यात येणार आहे. दुसरीकडे पंतप्रधान इम्रान खान हे आपले सरकार वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून त्यांना अधिक वेळ हवा असल्यानेच अविश्‍वास ठरावावरील मतदान पुढे ढकलले, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. (Imran Khan)

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांकडे टोमणे बॉम्ब नावाचं शस्त्र; फडणवीसांचा टोला

नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पाकिस्तान तेहरिक इन्साफचे खासदार खयाल झमन यांचे निधन झाल्याने कामकाज २८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केले. यानुसार इम्रान खान सरकारविरोधात अविश्‍वासाचा ठराव सोमवारी पटलावर मांडला जाणार आहे. सद्यःस्थिती पाहता इम्रान खान अल्पमतात आल्याचे दिसून येते. त्यांचे अनेक खासदार विरोधकांच्या बाजूला बसलेले दिसून आले. या कारणामुळेच इम्रान खान यांच्या खासदारांचे चेहरे हिरमुसले होते. येत्या दोन दिवसांत बंडखोर खासदारांचे मन कसे वळवता येईल, याचा प्रयत्न इम्रान खान यांच्याकडून राहील, असे राजकीय निरीक्षकांनी म्हटले आहे. आजचे कामकाज स्थगित करण्याच्या निर्णयाला विरोधकांनी आक्षेप घेतला, परंतु अध्यक्षांनी घटनात्मक अधिकाराचा उपयोग करत कार्यवाही स्थगित केल्याचे जाहीर केले. (Imran Khan)

हेही वाचा: मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी दरेकरांना दिलासा नाही

इम्रान खान मंत्रिमंडळातील सदस्यांनी मात्र चोवीस बंडखोर खासदारांना परत आणल्याचा दावा केला आहे. अर्थात या दाव्याला दुजोरा मिळू शकला नाही. त्याचवेळी नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांवर अविश्‍वास ठरावावरील कार्यवाही महिनाभरासाठी पुढे ढकलता येईल का, असा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अशी कृती झाल्यास पाकिस्तानात राजकीय वर्तुळात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांनी मात्र १७२ चा जादुई आकडा मिळवला असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इम्रान खान यांची गच्छंती अटळ आहे. दरम्यान, इम्रान खान यांनी रविवारी सभेचे आयोजन केले असून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देऊ, असे म्हटले आहे. (Imran Khan)

Web Title: No Confidence Motion Against Imran Khan Postponed The Struggle For Power Continues Vsh97

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top