ये सारी गद्दारी हो रही थी! इम्रान खान विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला

imran khan
imran khanimran khan

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आणण्यात आलेला अविश्वास ठराव डेप्युटी स्पीकर कासीम सुरी यांनी फेटाळून लावला आहे. अमेरिकेकडून इम्रान खान यांचं सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा ठराव सभापतींनी फेटाळून लावला आहे.

इम्रान खान यावेळी संसदेत उपस्थित नव्हते. मात्र त्यांनी राष्ट्रपतींना तत्काळ पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. आता इम्रान खान यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. मी राष्ट्रपतींना विनंती करतो की त्यांनी हे मंत्रिमंडळ बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्या, असं खान यांनी म्हटलंय. (Pakistan parliament Rejected No Confidence Motion Against PM Imran Khan)

imran khan
"राजीनामा देणार नाही; शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार"

देशातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी जनतेला संबोधित करताना सरकारविरोधात 'परकीय षडयंत्र' असल्याची भीती व्यक्त केली होती. पाकिस्तानात लष्कराची प्रभाव अत्यंत महत्वाचा आहे. आतापर्यंत एकाही पंतप्रधानाने त्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. मेजर जनरल बाज्वा आणि इम्रान खान यांच्यातील दरीमुळे हे प्रकरण सुरू असल्याचं म्हटलं जातंय.

सध्या इम्रान खान यांचं सरकार अल्पमतात आलं आहे. मात्र अविश्वास ठराव फेटाळल्याने आता इम्रान खान यांना तात्पुरतं तारलं गेलंय. परंतु देशात पुन्हा नव्याने निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. येणाऱ्या काळात सर्व खासदार राजीनामा देण्याच्या विचारात असून त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता वाढली आहे.

माझ्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावं - इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात होतं. विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता. अखेर तो फेटाळण्यात आला. मात्र, त्यापूर्वीच इम्रान खानने मोठी चाल खेळली. त्याने आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरून प्रदर्शन करायला सांगितले आहे. 2018 मध्ये इम्रान खान सत्तेत आले होते. इम्रान खान यांनी देश नीट न चालवल्यामुळे आर्थिक संकटात सापडला असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यास सांगितलं आहे. त्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानबाहेरून कट रचला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकांशी बोलताना इम्रान खान म्हणाले की, "स्वतंत्र आणि मुक्त पाकिस्तानसाठी तुम्ही या मतदानाला विरोध करावा." अमेरिका याबाबतीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही इम्रान खान यांनी केला. इम्रान यांना वॉशिंग्टन येथे पाकिस्तानी राजदूतांमार्फत एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याच्या रेकॉर्डींगबद्दलचं एक विस्तृत पत्र मिळालं. त्यामध्ये इम्रान यांनी पद सोडल्यास दोन्ही देशांतील संबंध सुधारतील असं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com