इस्राईलच्या पर्यटकांना मालदिवमध्ये ‘नो एंट्री’ ?

मुईझ्झू सरकारच्या हालचाली; इस्राईलच्या नागरिकांना परतण्याचे आवाहन
इस्राईलच्या पर्यटकांना मालदिवमध्ये ‘नो एंट्री’ ?
इस्राईलच्या पर्यटकांना मालदिवमध्ये ‘नो एंट्री’ ?Sakal

जेरुसलेम/माले : मालदिवच्या मुइझ्झू सरकारने इस्राईल आणि हमास संघर्षात पॅलेस्टिनींना पाठिंबा दिलेला असताना सरकारने पारपत्राच्या नियमात बदल केला आहे. यानुसार इस्राईल पारपत्रावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर इस्राईल नागरिकांना मालदिवला प्रवेश करता येणार नाही.

दरम्यान, इस्राईल सरकारने अधिसूचना जारी करत मालदिवला पर्यटनासाठी गेलेले किंवा तेथे राहत असलेल्या नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. मालदिवचा प्रवास टाळावा, असे त्यांनी नमूद केले आहे.

मालदिवचे गृहमंत्री अली इहुसन यांनी इस्राईलच्या नागरिकांना मालदिवमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर निर्बंध घालण्यासाठी नियमांत दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मालदिवच्या कॅबिनेटने बंदीची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्यासाठी विशेष समिती नेमली असून यात समितीत देशातील वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांचा समावेश आहे.

त्याचवेळी इस्राईलने आपल्या नागरिकांना इशारा देत मालदिवला न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच तेथे वास्तव्यास असलेल्या इस्रायली नागरिकांनी तातडीने परतावे, असे म्हटले आहे. इस्राईलने २५ मे रोजी राफावर हवाई हल्ला केला आणि त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला. इस्राईलच्या या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला आहे.

त्यानंतर मालदिवने इस्राईलच्या नागरिकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.यादरम्यान, भारतात असलेल्या इस्राईलच्या दूतावासाने पर्यटकांनी मालदिवऐवजी भारताला भेट द्यावी, असे आवाहन केले.

मालदिव येथे इस्राईलच्या पर्यटकांवर बंदी घातलेली असताना भारतातील सुंदर आणि नयनरम्य समुद्रकिनारे पाहण्यासाठी जाऊ शकता आणि त्याठिकाणी इस्राईलच्या पर्यटकांचा पाहुणचार नेहमीच चांगला होत असल्याचा अनुभव आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

मालेत निदर्शने

राजधानी माले शहरात एक महिन्यापासून इस्राईलच्या विरोधात आंदोलन केले जात आहे आणि इस्राईलच्या नागरिकांवर बंदी घालावी, अशी मागणी केली जात होती. यानुसार सरकारने निर्णय घेतला. मालदिवला दरवर्षी दहा लाख पर्यटक भेट देतात आणि त्यात २०२२ मध्ये १०,९६६ पर्यटकांनी मालदिवला भेट दिली. २०२३ मध्ये १५,७४८ इस्राईलचे नागरिक मालदिवला आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com