बीजिंगमध्ये मास्कची सक्ती हटविली; तेरा दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही

वृत्तसंस्था
Saturday, 22 August 2020

बिजिंगमध्ये दोन टप्प्यांत लॉकडाउन लागू करण्यात आले.त्यानंतर बहुतांश भागांतील स्थिती पूर्वपदावर आली.राजधानीत गेले 13दिवस एकही नवा रुग्ण आढळला नाही.चीनमध्ये गेले पाच दिवस एकही स्थानिक रुग्ण आढळला नाही.

बीजिंग - वुहानवासी पूल पार्टीत रमल्याची वार्ता ताजी असतानाच चीनची राजधानी बिजिंगही कोरोनामुक्त बनल्याचे स्पष्ट झाले. आता बाहेर असताना मास्क घालण्याची सक्ती हटविण्यात आली आहे.

संसर्ग आटोक्यात आल्यामुळे याआधी एप्रिल अखेरीस मास्कचा निर्बंध मागे घेण्यात आला होता, पण जूनमध्ये घाऊक बाजारपेठेशी संबंधित नवे रुग्ण वाढत्या संख्येने मिळायला लागले. त्यामुळे मास्क अनिवार्य करण्यात  आला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बिजिंगमध्ये दोन टप्प्यांत लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यानंतर बहुतांश भागांतील स्थिती पूर्वपदावर आली. राजधानीत गेले 13 दिवस एकही नवा रुग्ण आढळला नाही. चीनमध्ये गेले पाच दिवस एकही स्थानिक रुग्ण आढळला नाही.

कोरोना विषाणूचा उगम वुहानमध्ये झाल्याचे मानले जाते. त्यानंतर शीनजियांग आणि इतर काही ठिकाणी संसर्ग पसरला. त्यावरही लवकर नियंत्रण मिळविण्यात आले. कठोर लॉकडाउन, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि सामुहिक चाचण्यांमुळे कोरोना निर्मुलनात यशस्वी झाल्याचा दावा चीनचे आरोग्य अधिकारी  करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

...मात्र मास्क कायम
मास्क घालणे अनिवार्य नसले तरी बहुसंख्य लोकांनी शुक्रवारी मास्क घातला होता. काओ आडनाव असलेल्या 24 वर्षीय तरुणीने सांगितले की, मी कोणत्याही क्षणी मास्क काढून घेऊ शकते, पण इतरांना ते चालेल का हे पाहण्याची गरज आहे. मी मास्क घातलेला नाही हे पाहून लोक धास्तावून जातील अशी मला भिती आहे.

 चीनमधील स्थिती

  •     गुरुवारी चीनमध्ये
  •     22 रुग्णांची भर
  •     सर्व जण परदेशातून परतलेले नागरिक
  •     एकूण आकडा
  •     84 हजार 917
  •     बळींची एकूण संख्या 4634
  •     बहुतांश देशांच्या नागरिकांना चीनमध्ये प्रवेश बंद

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No new patients were found in the last 13 days in Beijing

Tags
टॉपिकस
Topic Tags: