डेनिस मुकवेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : 'द नॉर्वेजिया नोबेल कमिटी'ने 2018 या वर्षासाठी शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्काराची घोषणा केली. यामध्ये डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद या दोघांच्या नावांचा समावेश आहे. मुकवेगे आणि मुराद या दोघांनी युद्धादरम्यान लैंगिक हिंसेतील पीडितांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. 

शांततेचा नोबेल पुरस्कार देणारी समितीनुसार, यावेळी 216 व्यक्ती आणि 115 संस्थांचा विचार करण्यात आला होता. जगात शांतता टिकून राहावी यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीचा दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी यावर्षी एकूण 331 व्यक्तींच्या नावांचा विचार करण्यात आला होता. मात्र, यापैकी डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम-जोंग-उन, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-इन पोप फ्रान्सिस यांच्याही नावांचा समावेश होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobel Peace Prize 2018 Denis Mukwege Nadia Murad are the winners