Nobel Prize : सरकारविरोधात भूमिका घेणं पडलं महागात; 'नोबेल' विजेते बिलियात्स्कींना 10 वर्षांचा तुरुंगवास!

सरकारविरोधातील आंदोलनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलंय.
Nobel Peace Prize winner Ales Bialiatski
Nobel Peace Prize winner Ales Bialiatskiesakal
Summary

ऑक्टोबर 2022 मध्ये नॉर्वेजियन नोबेल समितीनं अॅलेस बिलियात्स्की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केलाय.

बेलारूसचे (Belarus) नोबेल शांतता पुरस्कार विजेते (Nobel Peace Prize Winner) आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) यांना स्थानिक न्यायालयानं 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीये.

सरकारविरोधातील आंदोलनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलंय. ऑक्‍टोबर 2022 मध्ये मानवी हक्कांचा प्रचार करण्‍यासाठी अॅलेस यांना नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं. अॅलेस यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, 'बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को (Alexander Lukashenko) यांचं सरकार त्यांना जबरदस्तीनं गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे.'

बिलियात्स्की यांना 10 वर्षांची शिक्षा

60 वर्षीय अॅलेस बिलियात्स्की यांना सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणं, आंदोलकांना निधी देणं यासाठी ही शिक्षा सुनावण्यात आलीये. नोबेल पारितोषिक विजेत्याशिवाय आणखी तीन जणांना सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी निधी दिल्याबद्दल शिक्षा झालीये. 2020 मध्ये झालेल्या निदर्शनांनंतर सरकारनं चौघांना अटक केली होती. हे सर्वजण बेलारूसचे अध्यक्ष म्हणून अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या निवडीला विरोध करत होते.

Nobel Peace Prize winner Ales Bialiatski
BJP-JDS वर नाराज असलेले काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार; कॅबिनेट मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

राजकीय सुडातून कारवाई

अॅलेस यांच्याविरुद्ध ही कारवाई राजकीय सुडातून केल्याचा आरोप अधिकार गटानं केला आहे. त्याच वेळी, निर्वासित बेलारशियन विरोधी पक्षनेत्या स्वेतलाना सिखानौस्काया (Svetlana Tsikhanouskaya) यांनी अॅलेस यांचं समर्थन केलं. 'सर्वांना चुकीच्या पद्धतीनं दोषी ठरवण्यात आलंय, हा निकाल धक्कादायक आहे.' सरकारी वकिलांनी मिन्स्क कोर्टाला (Minsk Court) बिलियात्स्की यांना 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यास सांगितलं होतं, परंतु न्यायालयानं हा आरोप लक्षात घेऊन त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच त्यांना US$ 65,000 चा दंड ठोठावण्यात आलाय.

Nobel Peace Prize winner Ales Bialiatski
Politics : शपथविधीला तीन दिवस शिल्लक असतानाच भावी मुख्यमंत्र्यांना मोठा दणका; 'या' आमदारांनी काढून घेतला पाठिंबा!

बिलियात्स्कींना 2022 मध्ये मिळाला 'नोबेल'

वेस्ना मानवाधिकार केंद्राचे प्रमुख अॅलेस बिलियात्स्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विरोधी निदर्शनं, मनी लाँड्रिंगला वित्तपुरवठा केल्याचा आरोप आहे. बिलियात्स्की यांना ऑगस्ट 2011 मध्ये ताब्यात घेण्यात आलं आणि नोव्हेंबर 2011 मध्ये करचुकवेगिरीसाठी 4.5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Nobel Peace Prize winner Ales Bialiatski
PM मोदींच्या नावानं मतं मागितली तर भाजप नेत्यांना चप्पलेने मारा; श्रीराम सेना प्रमुखांचं वादग्रस्त विधान

TASS च्या अहवालानुसार, जून 2014 मध्ये बिलियात्स्की यांची शिक्षा संपण्यापूर्वी सोडण्यात आलं. ऑक्टोबर 2022 मध्ये नॉर्वेजियन नोबेल समितीनं अॅलेस बिलियात्स्की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केलाय. वेस्ना प्रतिनिधी बिलियात्स्की यांच्यासह व्हॅलेंटिन स्टेफानोविच आणि व्लादिमीर लॅबकोविच यांनाही दोषी ठरवण्यात आलं होतं, त्यांना अनुक्रमे 9 आणि 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर, दिमित्री सोलोव्हियोव्ह यांना आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयानं प्रत्येकाला अंदाजे USD 40,000 चा दंड ठोठावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com