
नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफजई हिने बर्मिंगहममध्ये लग्न केलं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.
नोबेल विजेती मलालाने केले लग्न; पती असर मलिक कोण?
नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफजई हिने बर्मिंगहममध्ये लग्न केलं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. मलालाने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. फोटो पोस्ट करताना मलालाने म्हटलं की, घरीच लग्न झालं, पुढच्या वैवाहिक आयुष्यासाठी उत्साही आहे. मलालाने असर याच्याशी लग्न केलं आहे.
मलालाने ट्विटरवर म्हटलं की, आज माझ्या आय़ुष्यातील खास दिवस आहे. असर आणि मी लग्न केलं. आम्ही आमच्या कुटुंबासोबत बर्मिंगहममधील घरीच निकाह केला. आम्हाला आशीर्वाद द्या. पुढच्या वैवाहिक आयुष्यासाठी आम्ही उत्सुक आहे.
हेही वाचा: ‘क्लायमेट चेंज’चा जगात पहिला रुग्ण
पाकिस्तानी तालिबानींनी मलालावर मुलींच्या शिक्षणासाठी प्रचार करत असल्यानं गोळीबार केला होता. वयाच्या १५ व्या वर्षी स्कूल बसमध्ये मलालाच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर मलाला बरी झाली होती. २०१४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. भारतात बालकांच्या हक्कांसाठी लढणारे कैलाश सत्यर्थी यांच्यासोबत तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मलालाने गेल्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.
कोण आहे असर मलिक
असर मलिक हा पीसीबी क्रिकेट बोर्डाचा जनरल मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. मे २०२० मध्ये त्यानं क्रिकेट बोर्ड जॉइन केल्याचं त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये म्हटलं आहे. तसंच त्याआधी मलिकने पाकिस्तान सुपर लीगची फ्रँचाइजी मुलतान सुलतानचा ऑपरेशनल मॅनेजर म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. याशिवाय तो खेळाडूंसाठी व्यवस्थापन एजन्सीसुद्धा चालवतो. लाहोर विद्यापीठातून त्याने अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातून पदवी मिळवली आहे.
Web Title: Nobel Prize Winner Malala Yousafzai Gets Married With Asser Malik See Pictures
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..