'ट्रम्प यांचे वक्तव्य म्हणजे भुंकणाऱ्या कुत्र्यासारखे'

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

उत्तर कोरियातील सरकारी वृत्तपत्राने याबाबतचे वक्तव्य जाहीर करताना ट्रम्प यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. या वृत्तपत्राने म्हटले आहे, की ट्रम्प यांनी दिलेल्या धोक्याला उत्तर कोरिया एका विक्षिप्त व्यक्तीची प्रतिक्रिया आणि भुंकणाऱ्या कुत्र्यासमान समजते.

सेऊल : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्रांच्या बटणाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उत्तर कोरियाने आक्षेपार्ह वक्तव्य करताना ट्रम्प यांचे वक्तव्य म्हणजे भुंकणाऱ्या कुत्र्यासारखे असून, विक्षिप्त माणूस असे बोलू शकतो असे म्हटले आहे.

उत्तर कोरियातील सरकारी वृत्तपत्राने याबाबतचे वक्तव्य जाहीर करताना ट्रम्प यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. या वृत्तपत्राने म्हटले आहे, की ट्रम्प यांनी दिलेल्या धोक्याला उत्तर कोरिया एका विक्षिप्त व्यक्तीची प्रतिक्रिया आणि भुंकणाऱ्या कुत्र्यासमान समजते. ट्रम्प यांचे वक्तव्य हे पराभवाच्या मानसिकतेतून केलेले आहे. उत्तर कोरियाचे सैन्य आणि जनतेच्या होत असलेल्या प्रगतीमुळे त्यांनी हे वक्तव्य केले असून, ते एक मानसिक रोगी झालेले आहेत.

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन यांनी अण्वस्त्रांचे बटण माझ्या टेबलावर असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी वक्तव्य केले होते, की आमच्याकडे उत्तर कोरियाकडे असलेल्या अण्वस्त्रांपेक्षा शक्तीशाली शस्त्रे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Korea calls Trump nuclear button boast the bark of a rabid dog