दक्षिण कोरियाच्या 'त्या' कृतीमुळे किम जोंग उन संतापले; उचललं मोठं पाऊल

वृत्तसंस्था
Tuesday, 9 June 2020

उत्तर कोरियाने आपले शेजारी राष्ट्र दक्षिण कोरियासोबतचे सर्व प्रकारचे लष्करी आणि राजनैतिक संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- उत्तर कोरियाने आपले शेजारी राष्ट्र दक्षिण कोरियासोबतचे सर्व प्रकारचे लष्करी आणि राजनैतिक संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाकडून सीमेवर आपत्तीजनक पत्रकं वाटण्यात आली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितलं आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये असलेले संबंध अधिक ताणले जाणार आहेत. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे मून जे इन यांच्यात तीन शिखर वार्ता संम्मेलन झाले आहेत. मात्र, कोरियाई देशातील संबंध हे ताणले गेले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरिया सर्वात आधी कोरियाई देशांमध्ये असलेल्या संपर्क लाईनला तोडणार आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संपर्क पूर्णपणे तुटणार आहे. तसेच खास राष्ट्रपतींसाठी तयार करण्यात आलेली हॉट लाईन देखील तोडली जाणार आहे. दक्षिण कोरियाच्या विश्वासघातकी वागणुकीवर आम्ही नाराज असल्याचं उत्तर कोरियाने म्हटलं आहे. तसेच दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे किम जोंग उन यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली आहे, असं उत्तर कोरियाने म्हटलं आहे. 
----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी
---------- 
वेगळे झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणावाचं वातावरण राहिलं आहे. दक्षिण कोरियावर अमेरिकेचा तर उत्तर कोरियावर चीनचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. उत्तर कोरियाने मागील आठवड्यातच दक्षिण कोरियाला सर्व संबंध तोडण्याची धमकी दिली होती. दक्षिण कोरियाने त्यांच्या भूमीवर उत्तर कोरिया विरोधी कटकारस्थान करणाऱ्यांविरोधात कारवाई केली नाही, तर आम्ही सर्व संबंध तोडू, असा इशारा किम जोंग उन यांनी दिला होता. 

दरम्यान, दक्षिण कोरियामधील काही संघटना उत्तर कोरिया या देशाचा तीव्र विरोध करतात. सीमेपार पत्रकं फेकणे, हवेत फुगे सोडणे अशाप्रकारच्या घटना घडत असतात. पत्रकांमध्ये आणि फुग्यांमध्ये किम जोंग उन यांच्या विरोधात अश्लिल भाषा आणि उत्तर कोरियाविरोधात खूप काही लिहिलं जातं. उत्तर कोरियाने अनेक वेळा याविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, दक्षिण कोरियाकडून याची दखल घेतली जात नसल्याने उत्तर कोरियाने मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Korea cut communication lines with South Korea