esakal | 'खायला अन्न नाही, मदत करा'; हुकूमशहा किम जोंग उन झाले हतबल
sakal

बोलून बातमी शोधा

kim jong un.jpg

संयुक्त राष्ट्राला पाठवलेल्या एका रिपोर्टमध्ये उत्तर कोरियाने म्हटलंय की, त्यांचे धान्य भांडार जवळजवळ रिकामे झाले आहेत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय मदतीची आवश्यकता आहे.

'खायला अन्न नाही, मदत करा'; हुकूमशहा किम जोंग उन झाले हतबल

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

प्योंगयांग- उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी मान्य केलंय की त्यांचा देशात अन्यधान्याची टंचाई जाणवू लागली आहे. संयुक्त राष्ट्राला पाठवलेल्या एका रिपोर्टमध्ये उत्तर कोरियाने म्हटलंय की, त्यांचे धान्य भांडार जवळजवळ रिकामे झाले आहेत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय मदतीची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी उत्तर कोरियात धान्य तुटवडा असल्याचा दावा अनेकदा केला होता. पण, किम जोंग उन यांनी हा दावा फेटाळला होता. अखेर पहिल्यांदा उत्तर कोरियाने अधिकृतरित्या देशातील गंभीर परिस्थिती मान्य केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (North Korea facing worst food Crisis shortage in decade World News)

उत्तर कोरियाचे शासक किम जोंग ऊन आपल्या मनमानी कारभारासाठी ओळखले जातात. असे सांगितले जाते की त्यांच्या कार्यकाळात उत्तर कोरिया वाईट परिस्थितीतून जात आहे. उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्राला एक रिपोर्ट पाठवला आहे. यात लिहिण्यात आलंय की, 2018 पासून देशातीन धान्य उत्पादन खालच्या स्तराला गेले आहे. ज्याचे मुख्य कारण नैसर्गिक आपत्ती आणि अपुऱ्या कृषी सुविधा सांगितलं जात आहे. उत्तर कोरियाकडे आजही आधुनिक कृषी उपकरणे नाहीत. त्यामुळे त्यांच्या धान्य उत्पादनात वाढ झालेली नाही. संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या रिपोर्टमध्ये उत्तर कोरियाने याचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे उत्तर कोरियाने पहिल्यांदा सार्वजनिक रित्या देशातील धान्य टंचाई मान्य केली आहे.

हेही वाचा: आरक्षणाचासाठी ओबीसींचा ‘इम्पिरिकल डेटा’ गोळा करणार

निर्बंध हटवण्याची मागणी

किंम जोग यांनी आतापर्यंत आपले कठोर चेहरा जगासमोर ठेवला आहे. पण, संयुक्त राष्ट्राला दिलेल्या रिपोर्टमध्ये त्यांनी थोडीशी नरमाई दाखवल्याचं दिसतंय. त्यांनी रिपोर्टमध्ये म्हटलंय की, संयुक्त राष्ट्राने अनेक निर्बंध लादले असल्याने त्यांना म्हणावा तसा विकास करता येत नाहीये. अण्वस्त्र चाचणी आणि मिसाईलच्या चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदने 2017 मध्ये उत्तर कोरियावर अनेक निर्बंध लादले. त्यामुळे कच्चा माल, तेल, गॅस अशा वस्तूंच्या आयातीवर बंधनं आली आहेत. तसेच उत्तर कोरियातील नागरिकांना इतर देशात काम करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. अशा सर्व कठीण परिस्थितीमुळे किंम जोंग उन कमकूवत झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळेच त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे मदत मागितली असल्याचं सांगितलं जातं.

loading image