किम जोंगचं वजन खूपच घटलं; नॉर्थ कोरियन जनता हवालदिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किम जोंग उन

किम जोंगचं वजन खूपच घटलं; नॉर्थ कोरियन जनता हवालदिल

क्रौर्य आणि तितक्याच कडवट स्वभावासाठी जगभर कुख्यात असलेले उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. किम जोंग उन यांचा ताजा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचं हृदय तुटलं असून दु:ख होत असल्याचा दावा उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाने केला आहे. सरकारी चॅनलवर किम जोंग उन यांच्यावर स्पेशल गाणं आणि कार्यक्रम दाखवण्यात आला होता. त्यानंतर यावर उत्तर कोरियाच्या लोकांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या होत्या. किम जोंग यांच्या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना उत्तर कोरियाच्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किम जोंग उन यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ते एकदम बारीक झाल्याचं पाहायलं मिळालं. मात्र त्याने वजन घटवलंय की त्याची प्रकृतीच ढासळलीय की त्यांना कोणता आजार जडलाय याबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत. यावरुन उत्तर कोरियाच्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. किम जोंग यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया मागवल्या होत्या. यामध्ये एका व्यक्तीनं म्हटले की, 'आदरणीय कॉम्रेड महासचिव (किम जोंग उन) यांची प्रकृती पाहून दु:खी आहोत. आमचं हृदय तुटलं आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातून आश्रू वाहत आहेत.'

जुन्या फोटोंची तुलना-

एनके न्यूजच्या वृत्तानुसार, उत्तर कोरिया आणि तिथल्या नेत्यांवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, किम जोंग उनने खूपच वजन घटवलं आहे. किमच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मधील फोटोची, एप्रिल 2021 आणि जून 2021 च्या फोटोशी तुलना केल्यास हे स्पष्ट होतंय की त्याने वजन घटवलं आहे.

Web Title: North Koreans Worry Over Kim Jong Uns Weight Loss After Watching Recent Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kim Jong Un