झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नाही...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जुलै 2018

क्वालालंपूर : वादग्रस्त मुस्लिम प्रचारक झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नसल्याचे मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी सांगितले आहे. आज  (शुक्रवार) त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ''झाकीर नाईकमुळे कोणतीही समस्या निर्माण झालेली नाही. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रश्नच नाही'', असे मलेशियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.  एका पत्रकार परिषदेत त्यांनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

भारताने केलेल्या प्रत्यार्पणाच्या मागणीवर मलेशिया सरकार विचाराधीन आहे अशी माहिती समोर आली होती. मात्र आज मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाला नकार दिला आहे.

Web Title: not possible to send zakir naik to india