YouTuber : आता छोट्या यूट्यूबरलाही मिळणार कमाईची संधी

यूट्यूबवरून माहिती, व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचतातच पण सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे यातून मिळणारा पैसा.
Youtuber
Youtubersakal

न्यूयॉर्क - यूट्यूबवरून माहिती, व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचतातच पण सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे यातून मिळणारा पैसा. जेवढे जास्त सबस्क्रायबर तेवढी जास्त कमाई असे गणित असलेल्या यूट्यूबने छोट्या आशय निर्मात्यालाही (कंटेन्ट क्रिएटर) पैसे मिळविण्याची संधी दिली आहे. यासाठी किमान सबस्क्रायबरची संख्या एक हजारावरून ५०० पर्यंत खाली आणली आहे.

कमी सबस्क्रायबर संख्या असलेल्या लहान यूट्यूबरलाही त्याने तयार केलेल्या व्हीडिओतून सहज पैसे मिळावेत, यासाठी गुगलच्या मालकीच्या या कंपनीने कमाई धोरणात नुकतेच मोठे बदल केले आहेत. या व्यासपीठाने त्यांच्या ‘यूट्यूब पार्टनर प्रोग्राम’ (वायपीपी) या उपक्रमासाठीचा निकष शिथिल केला आहे. याद्वारे कमी फॉलोवर असलेल्या आशय निर्मात्याला पैसे कमविण्याचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Youtuber
China Made flying saucer: चीनने बनवली जगातील पहिली उडती तबकडी

नियमातील अन्य बदल

  • यूट्यूरबचे सादरीकरण पाहण्याच्या वेळेची निकष मर्यादा चार हजारहून तीन हजारवर आणली आहे.

  • कमी वेळेच्‍या सादरीकरणासाठी ही मर्यादा एक कोटीहून ३० लाखांपर्यंत कमी केली.

  • हे बदल सुरुवातीला अमेरिका, ब्रिटन कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियात लागू होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com