Corona Test App : आता आवाज ऐकून होणार कोरोना टेस्ट; वैज्ञानिकांनी केला दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona test

Corona Test App : आता आवाज ऐकून होणार कोरोना टेस्ट; वैज्ञानिकांनी केला दावा

New Research for Covid-19 Testing : गेल्या तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे जगातील प्रत्येक नागरिक वैतागला आहे. त्यात कोरोनाचे येणारे विविध व्हेरिएंट यामुळे नागरिकांच्या मनात कायम भीती आहे. मात्र, या सर्वामध्ये नागरिकांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या आजाराचे निदान करण्यासाठी बाजारात अनेक चाचणी पद्धती उपलब्ध आहेत. मात्र, आता शास्त्रज्ञांनी एक असे अॅप विकसित केले आहे. ज्यामुळे एखाद्याच्या आवाजावरून संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याचे निदान होत असल्याचा दावा केला आहे. याद्वारे करण्यात येणाऱ्या चाचणीचा निकाल 89 टक्के अचूक असल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

विकसित केलेले अॅप इतर चाचण्यांपेक्षा अधिक अचूक, तुलनेने स्वस्त, जलद आणि वापरण्यास सोपे असल्याचा दावा इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स, मास्ट्रिच युनिव्हर्सिटी नेदरलँड येथील संशोधकांनी केला आहे. विकसित केलेल्या मोबाईल अॅपमध्ये AI च्या मदतीने एखाद्या व्यक्तीला COVID-19 संसर्ग आहे की नाही यासाठी आवाजाचे विश्लेषण केले जाते.

हे अॅप कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये उपयुक्त ठरू शकेल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, AI मॉडेलची अचूकता 89 टक्क्यांपर्यंत आहे. शास्त्रज्ञांनी 4,352 निरोगी आणि आजाराची लक्षण असणाऱ्या 893 ऑडिओ नमुन्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मेल-स्पेक्ट्रोग्राम विश्लेषणाचा वापर केला, त्यापैकी 308 जणांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे मास्ट्रिच युनिव्हर्सिटीच्या वफा अल्जाबवी यांनी सांगितले.

Web Title: Now Mobile App Will Detect Covid People Through Voices Scientists Created Unique Mobile Aap

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..