जगात सहापैकी एक बालक गरीब

पीटीआय
Saturday, 24 October 2020

जगात सहापैकी एक बालक म्हणजेच ३५ कोटी ६० लाख मुले हालाखीचा सामना करत होते. परंतु आता कोरोनामुळे आणि कोरोनानंतरच्या काळात ही स्थिती आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्क - कोरोनामुळे गरीबीत राहणाऱ्या मुलांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. युनिसेफच्या नव्या अहवालानुसार कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी जगात सहापैकी एक बालक म्हणजेच ३५ कोटी ६० लाख मुले हालाखीचा सामना करत होते. परंतु आता कोरोनामुळे आणि कोरोनानंतरच्या काळात ही स्थिती आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक बँक आणि यूएन चिल्ड्रन्स फंड यांच्या ‘ग्लोबल इस्टिमेट ऑफ चिल्ड्रन इन मॉनेट्री पॉवरटी: ॲन अपडेट’ च्या नुसार मर्यादित स्रोतांमुळे सब-सहारा आफ्रिका भागातील एकूण मुलांपैकी दोन तृतियांश मुलांची स्थिती शोचनिय आहे. याचाच अर्थ असा की दररोज १.९० डॉलरपेक्षा कमी उत्पन्नगटातील कुटुंबात ही मुले राहत आहेत. जागतिक निकषानुसार हा उत्पन्न गट अत्यंत गरीबीच्या श्रेणीत मोडतो. विशेष म्हणजे या मुलांपैकी एक पंचमांश मुले दक्षिण आशियातील आहेत. युनिसेफच्या विश्‍लेषणानुसार, २०१३ ते २०१७ या काळात अत्यंत गरीबीत राहणाऱ्या मुलांच्या संख्येत घट झाली होती. मात्र अलिकडच्या काही वर्षात विकासाचा वेग मंदावल्याने तसेच महामारीमुळे गरीब मुलांची संख्या पुन्हा वाढू शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of children living in poverty is likely to be around corona