Global News : परदेशी पुतना मावशी; सात अर्भकांचा बळी घेतला, १० जणांच्या खूनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nurse Killing Babies
Global News : परदेशी पुतना मावशी; सात अर्भकांचा बळी घेतला, १० जणांच्या खूनाचा प्रयत्न

Global News : परदेशी पुतना मावशी; सात अर्भकांचा बळी घेतला, १० जणांच्या खूनाचा प्रयत्न

सात नवजात बालकं आणि इतर १० जणांचा खून केल्याचा एका नर्सवर आरोप आहे. असे गंभीर आरोप तिने फेटाळले असले तरी आता न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. तिच्यावर तब्बल २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लुसी लेटबी असं या नर्सचं नाव आहे.

तिच्याविरोधात मँचेस्टर क्राऊन कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही नर्स नवजात शिशू विभागामध्ये काम करते. ती एका बाळाची काळजी घेत, त्याच्या सोबत होती. त्याच वेळी या बाळाचा मृत्यू झाला. लुसीला त्या बाळाची देखभाल करण्याचं काम नेमून दिलेलं नव्हतं, ते काम दुसऱ्याच नर्सला दिलेलं होतं. तरीही वारंवार लुसी त्या बाळाच्या खोलीत जात येत होती.

या बाळाचं वजन २ पाऊंडपेक्षाही कमी होतं. याचा जन्म १० आठवडे आधीच झाला होता. आईच्या गरोदरपणातल्या काही समस्यांमुळे त्याचा जन्म लवकर झाला होता. या बाळाला न्यूमोनिया झाला असून त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. या नर्सने या बाळाला त्याच्या पोटात हवा भरुन मारून टाकल्याचा आरोप या नर्सवर आहे. नर्सने बाळाच्या पोटात हवा भरल्यानंतर हे बाळ गुदमरून गेलं आणि त्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. अशाच पद्धतीने तिने सात लहान बाळांना ठार केलं असून इतर १० जणांना मारण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :global news