Muslim Nations
Muslim Nations esakal

israel iran war: इस्त्रायलविरोधात ५७ मुस्लिम देश एकवटणार? खलिफा एर्दोगानची मोठी चाल

57 Muslim Nations Convene in Istanbul Amidst Escalating Middle East Crisis: डार यांनी सांगितले आहे की, ते गाझामध्ये तातडीने युद्धबंदीची मागणी करतील आणि पॅलेस्टाईनच्या मानवी हक्कांचा मुद्दा उपस्थित करतील.
Published on

इस्तंबूल: इस्त्रायलचे गाझावरील हल्ले अजूनही सुरू आहेत. दुसरीकडे इराणसोबतच्या युद्धामुळे मध्यपूर्वेला विध्वंसाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जगातील इस्लामिक देश एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. इस्लामिक सहकार्य संघटनेचे (OIC) ५७ सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आज (शनिवारी) तुर्कीतील इस्तंबूल येथे भेटणार आहेत. या बैठकीत इस्त्रायलविरोधात एकत्रित विरोध नोंदवला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत इराणचे परराष्ट्र मंत्रीही सहभागी होण्याची शक्यता आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान स्वतः या बैठकीचे उद्घाटन भाषण देतील आणि परराष्ट्र मंत्री हाकान फिदान संघटनेचे अध्यक्षपद सांभाळतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com