ओमिक्रॉनचं नवं लक्षण जे फक्त रात्री दिसतं; कोणीच सुरक्षित नाही

आतापर्यंत जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनीही ओमिक्रॉनमध्ये अनेक लक्षणे दिसल्याचा दावा केला आहे
omicron
omicronOmicron

कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन (Omicron) हा जगासमोर नवीन समस्या (New symptoms) बनली आहे. त्याची तीव्रता, संक्रमण दर आणि लक्षणांबाबत विविध दावे (Various claims regarding symptoms) केले जात आहेत. डब्ल्यूएचओने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) दावा केला आहे की, ओमिक्रॉन हा यापूर्वी संसर्ग झालेल्यांना सहजपणे संक्रमित करू शकते. तसेच ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते देखील ओमिक्रॉनपासून सुरक्षित नाहीत.

व्हायरल इन्फेक्शनचा सर्वांत धोकादायक पैलू म्हणजे त्याची तीव्रता. कोविडच्या डेल्टा प्रकाराने भारतासह जगभरातील देशांमध्ये कहर केला आहे. डेल्टा वेरिएंटची संक्रामकता खूप जास्त होती. यामध्ये रुग्णांना सौम्य आणि गंभीर लक्षणे जाणवत होती. तीव्र ताप, सततचा खोकला, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तात ऑक्सिजनची कमतरता अशी लक्षणे दिसून येत होती.

आता ओमिक्रॉन नवीन समस्या बनली आहे. त्याची तीव्रता, संक्रमण दर आणि लक्षणांबाबत विविध दावे केले जात आहेत. ओमिक्रॉन किती धोकादायक आहे हे येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत स्पष्ट होईल, असे दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाचे जनरल प्रॅक्टिशनर डॉ. अनबेन पिल्ले म्हणाले. आतापर्यंत जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनीही ओमिक्रॉनमध्ये अनेक लक्षणे दिसल्याचा दावा केला आहे.

omicron
दारूवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात; नवे दर जाहीर

रात्री घाम येणे आणि अंगदुखी

ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीला रात्री (Appear at night) घाम येऊ शकतो. कधीकधी रुग्णाला इतका घाम येतो की कपडे किंवा पलंगही ओला होतो. थंड जागी असले तरीही संक्रमित व्यक्तीला घाम येऊ शकतो. याशिवाय रुग्णाला शरीरात वेदना होत असल्याची तक्रारही होऊ शकते.

कोरडा खोकला आणि अंगदुखी

ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णामध्ये कोरड्या खोकल्याची लक्षणे देखील दिसली आहेत. कोरोनाच्या आतापर्यंतच्या सर्व जुन्या स्ट्रेनमध्ये ही लक्षणे दिसून आली आहेत. याशिवाय ताप आणि स्नायू दुखणे ही देखील ओमिक्रॉनची लक्षणे असू शकतात.

घसा सुजणे

ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये घसा खवखवल्यासारखे घसा सोलल्यासारख्या समस्या दिसून आल्या. जी असामान्य आहे. ही दोन लक्षणे जवळपास सारखीच असू शकतात. तथापि, घशात सोलण्याची समस्या अधिक वेदनादायक असू शकते.

सौम्य ताप

कोरोनाच्या कोणत्याही प्रकारासह सौम्य किंवा जास्त तापाच्या तक्रारी सातत्याने नोंदवल्या जात आहेत. ओमिक्रॉन संसर्गामध्ये रुग्णाला सौम्य ताप येऊ शकतो आणि यामध्ये शरीराचे तापमान स्वतःच सामान्य होते.

थकवा

मागील सर्व प्रकारांप्रमाणे रुग्णाला ओमिक्रॉनमध्ये खूप थकवा जाणवू शकतो. यामध्ये संक्रमित व्यक्तीची ऊर्जा पातळी खूप कमी होते. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी कोविड चाचणी त्वरित करायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com