ओमिक्रॉनवर लस मार्च महिन्यापर्यंत तयार होईल - Pfizer

Vaccine
Vaccinesakal
Summary

याआधी मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बन्सल यांनी सांगितलं होतं की, कंपनी एक बूस्टर डोस तयार करत आहे.

न्यूयॉर्क - भारतासह (India) जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर अनेक देशात लशीचे बूस्टर डोस दिले जात आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी लस तयार करण्याचं काम सुरु आहे. ओमिक्रॉनवर प्रभावी ठरेल अशी लस मार्चमध्ये तयार होईल असा विश्वास फायजर (Pfizer) कंपनीला आहे. कंपनीच्या प्रमुखांनी याबाबतची माहिती सोमवारी दिली.

फायजरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट यांनी म्हटलं की, अनेक देशांकडून लशीची मागणी वाढल्यानं फायजर कंपनी मोठ्या प्रमाणावर लस तयार करत आहे. त्यातच आता रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच आता लस घेतलेल्यांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ओमिक्रॉनवर प्रभावी ठरेल अशी लस मार्चमध्ये तयार होईल. मला माहिती नाही याची गरज असेल की नाही, तसंच याचा वापर कसा केला जाईल हेसुद्धा माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सीईओ अलबर्ट यांनी म्हटलं की, दोन डोसची लस सध्या दिली जात आहे. एका बूस्टर डोसमुळे ओमिक्रॉनपासून होणाऱ्या गंभीर परिणामांपासून संरक्षण मिळते. मात्र थेट ओमिक्रॉन व्हेरिअंटवर प्रभावी ठरणारी व्हॅक्सिन ब्रेकथ्रू इन्फेक्शनपासून संरक्षण करेल असंही त्यांनी सांगितले.

Vaccine
देशात दिवसभरात १.६८ लाख नवे रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४,४६१

याआधी मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बन्सल यांनी सांगितलं होतं की, कंपनी एक बूस्टर डोस तयार करत आहे. यामुळे ओमिक्रॉन आणि इतर नव्या स्ट्रेनचा सामना करता येईल. संभाव्य बूस्टर डोससाठी जगभरात आरोग्य क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com