ओमिक्रॉनची लाट येतेय, सावध राहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Omicron
ओमिक्रॉनची लाट येतेय, सावध राहा

ओमिक्रॉनची लाट येतेय, सावध राहा

व्हिएन्ना : युरोपमध्ये ओमिक्रॉनच्या (Omicron in Europe)संसर्गाची मोठी लाट येण्याची शक्यता असल्याने ती रोखण्यासाठी आतापासून उपाययोजना करा, अशी विनंती जागतिक आरोग्य संघटनेने(World Health Organization) युरोपमधील देशांना केली आहे. ओमिक्रॉनचा आणखी काही देशांमध्ये पसरत असल्याचे ‘डब्लूएचओ’च्या युरोप विभागाचे संचालक डॉ. हान्स क्लुग यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

ओमिक्रॉनचा संसर्ग जगातील एकूण ९६ देशांमध्ये पसरला आहे. अनेक देशांनी कोरोना नियमांची पुन्हा कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. क्लुग म्हणाले की,‘‘युरोप विभागातील ५३ देशांपैकी ३८ देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणू आढळून आला आहे. येत्या काही आठवड्यांत तो आणखी पसरण्याची शक्यता आहे. ब्रिटन, डेन्मार्क आणि पोर्तुगाल या देशांमध्ये या विषाणूचा प्रभाव वाढला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास संसर्गाची मोठी लाट येण्याची शक्यता आहे.’’

हेही वाचा: 5G Network : जुही चावलाच्या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी

पन्नास कोटी मोफत चाचण्या : बायडेन

वॉशिंग्टन : ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चाचण्यांवर अधिक भर दिला आहे. चाचण्या करवून घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांनी ५० कोटी मोफत चाचण्यांची घोषणा केली आहे. तसेच, लसीकरणाचा वेग दुप्पट करणे, रुग्णालयांना अधिक मदत पुरविणे असे उपाय करण्यात आले आहेत.

संसर्गाच्या पार्श्वभूमीवर

  • जर्मनीमध्ये नाताळनंतर नियमांची कडक अंमलबजावणी होणार

  • दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले

  • ब्रिटनमध्ये विलगीकरण आता

  • १० ऐवजी सातच दिवस

परिस्थिती सुरळीत होण्याची चिन्हे असतानाच आपण सर्वांत भयानक संसर्गस्थितीच्या दिशेने जात आहोत. ओमिक्रॉनचा सर्वांनाच धोका आहे. जगातील प्रत्येक देशापर्यंत तो लवकरच पोहोचेल.

- बिल गेट्‌स, संस्थापक, मायक्रोसॉफ्ट

Web Title: Omicron Waves Are Coming Be Careful

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top