Turkey Syria Earthquake
Turkey Syria Earthquakeesakal

Turkey Syria Earthquake : तुर्कीमध्ये अडकले भारतीय नागरिक; परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद

Turkey Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत एकूण 8000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक इमारती पत्त्याच्या घरासारख्या कोसळल्या आहेत.

आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा म्हणाले की, भारताने तुर्कीच्या अडाना येथे एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

ज्या ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले तिथे तब्बल १० भारतीय अडकल्याची माहिती वर्मा यांनी दिली. परंतु ते १० भारतीय सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र एक भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता आहे.

Turkey Syria Earthquake
Shiv Sena : 'मविआ'तून बाहेर पडतो, असा शब्द मोदींना देऊन ठाकरे परतले होते' केसरकरांचा गौप्यस्फोट

तुर्की येथे बेपत्ता असलेला भारतीय बंगळुरु येथील आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाच्या आणि तो काम करत असलेल्या बंगळूरु येथील कंपनीच्या संपर्कात आहोत, असं संजय वर्मा म्हणाले.

तुर्कीमध्ये जवळपास तीन हजार भारतीय नागरिक राहतात. भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्या कक्षामध्ये आतापर्यंत ७५ जणांचे कॉल आलेले आहेत. याशिवाय भारतीयांना विमानांमधून मदत पाठवण्यात येत आहे. त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत.

हेही वाचा: Narendra Modi : 'तुम्ही कितीही वाढवा दाढी.. लै मजबुत मोदींची बॉडी' अन् सभागृहात एकच हशा पिकला

तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, 6 फेब्रुवारी रोजी कहरामनमाराश परिसरात झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपानंतर आतापर्यंत एकूण 435 भूकंपांची नोंद झाली आहे. भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्यासाठी आतापर्यंत एकूण 60,217 कर्मचारी आणि 4,746 वाहने आणि बांधकाम उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com