अवघं एक वर्षाचं बाळ, महिन्याला कमावतंय ७५ हजार रुपये; पाहा Photo

इन्फ्लूएन्सर बाळाने ४५ वेळा विमान प्रवास केला, १६ अमेरिकन राज्यांना भेट दिली
अवघं एक वर्षाचं बाळ, महिन्याला कमावतंय ७५ हजार रुपये; पाहा Photo

सध्याचं जग इंटरनेटचं जग आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीची माहिती जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचण्यासाठी फक्त काही सेकंदांचा कालावधी लागतो. यात महत्त्वाची भुमिका बजावतात ते सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर. प्रवास आणि अन्नापासून ते आरोग्य आणि सौंदर्यापर्यंतचे अनेक विषय इन्फ्लूएन्सर्स पुढे आणत आहेत.

तुमचा विश्वास बसणार नाही, पण एक वर्षाचे बाळ सध्या इन्फ्लूएन्सर्स म्हणून व्हायरल झाले आहे. बेबी ब्रिग्स हा आतापर्यंतचा सर्वात तरुण ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर ठरला आहे आणि अमेरिकेत प्रवास करून तो तब्बल १००० डॉलर्स म्हणजेच अंदाजे ७५००० रुपये कमावत आहे.

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, ''या इन्फ्लूएन्सर बाळाने ४५ वेळा विमान प्रवास केला असून त्याने अलास्का, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, युटा आणि इडाहो यासह १६ अमेरिकन राज्यांना भेट दिली आहे.

बाळाची आई जेसने माहिती दिली की, ''ब्रिग्सचा जन्म गेल्या वर्षी १४ ऑक्टोबर रोजी झाला होता, त्यानंतर फक्त तीन आठवड्यांच्या वयातच त्याने पहिला विमान प्रवास केला. त्याने अलास्कामध्ये अस्वल, यलोस्टोन नॅशनल पार्कमधील लांडगे, युटामधील डेलीकेट आर्च आणि कॅलिफोर्नियामधील समुद्रकिनारे पाहिले आहेत.

इंस्टाग्रामवर ब्रिग्सचे ३०००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याची आई आधीपासूनच ‘पार्ट टाइम टूरिस्ट’ नावाचा ब्लॉग चालवत होती, ज्याद्वारे तिला जगभर प्रवास करण्यासाठी पैसे दिले जात होते. जेस म्हणाली की, “ जेव्हा मी २०२० मध्ये गरोदर राहिले, तेव्हा माझी कारकीर्द संपणार, अशी भीती मला वाटत होती. मला माहित नव्हते की, बाळाला घेऊन ते चालू ठेवणे शक्य होईल की नाही.”

ती पुढे म्हणाली, “माझे पती आणि मला ते काम करायचे होते. म्हणून बाळासोबत प्रवास करण्याबाबत माहिती शोधत होते पण, मला एकही सापडले नाही! तेव्हा मी शिकलेली प्रत्येक गोष्ट, मग त्या चांगली असो वा वाईट ती सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करू शकते हे लक्षात आले. पहिल्यांदाच पालक झालेल्यांना मदत व्हावी, यासाठी आपल्या बाळासोबत प्रवास करण्याचा एक मजेदार पर्याय निवडण्याचा आम्ही निर्णय घेतला.”

अवघं एक वर्षाचं बाळ, महिन्याला कमावतंय ७५ हजार रुपये; पाहा Photo
Drug case: चंकी पांडेंची मुलगी अडचणीत, अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा

या कुटुंबाने कोविड -१९ लॉकडाऊनमधून योग्य खबरदारी घेऊन प्रवास केला आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले. त्यांनी रस्ते प्रवास आणि स्थानिक सुट्ट्यांवर लक्ष केंद्रित केले, जेथे ते सोशल डिस्टन्स राखत येेईल. “आम्ही मोठ्या शहराचा प्रवास टाळला, म्हणून आम्ही न्यूयॉर्क शहरासारख्या ठिकाणी गेलो नाही. त्याऐवजी आम्ही जगासमोर न आलेल्या जागांचा शोध घेणे आणि बाहेरच्या ठिकाणी प्रवासा करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे, ” असं जेसने डेली मेलला सांगितले.

अवघं एक वर्षाचं बाळ, महिन्याला कमावतंय ७५ हजार रुपये; पाहा Photo
'टीम इंडिया'ला नावं ठेवणाऱ्या क्रिकेटरकडून चक्क संघाची स्तुती

बेबी ब्रिग्जकडे एक प्रायोजक देखील आहे, जो त्यांना विनामूल्य डायपर आणि वाइप्स प्रदान करतो. जेस आणि ब्रिग्स हे पुढील सहा महिन्यांत लंडनसह युरोपच्या सहलीची योजना आखत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com