
पाकिस्तान हा दहशतवादाचा मूळ आश्रयस्थान आहे, हे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानच्या दहशतवादी असलेल्या भागात 25 मिनिटांत 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृत दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अब्दुल रौफ आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी सहभागी झाले. ही घटना पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या धोरणाची साक्ष आहे.