
बैरूत : सीरियामधील सुरक्षा दले आणि माजी अध्यक्ष बाशर अल असाद यांच्या सशस्त्र समर्थकांमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात एक हजारहून अधिक जणांचा बळी गेला असल्याचे युद्ध निरीक्षक संस्थांनी सांगितले. सूड म्हणून एकमेकांच्या समर्थकांची हत्या केली जात असल्याने जीवितहानीचे प्रमाण अधिक असल्याचे या संस्थांनी सांगितले.