पेशावरमधील कपूर हवेली पाडण्यावर मालक ठाम; राज कपूर यांच्या जन्मस्थानी संकुल उभारणार

पीटीआय
Monday, 13 July 2020

कपूर हवेलीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संग्रहालय उभारण्याचे आश्वासन पाक परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी २०१८ मध्ये ऋषी कपूर यांना दिले होते. तशी विनंती ऋषी कपूर यांनी केली होती.

पेशावर  - शोमन राज कपूर यांचे जन्मस्थान असलेली पेशावरमधील कपूर हवेली पाडण्यावर जागामालक ठाम असून तेथे व्यापारी संकुल उभारण्यास त्यांनी पसंती दिली आहे.

खैबर पख्तुनख्वा प्रांतामधील या शहरातील किस्सा ख्वानी बाजार परिसरातील कपुर हवेलीची मालकी धनाढ्य सराफ हाजी मुहम्मद इस्रार यांच्याकडे आहे. सध्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली असून कोणत्याही क्षणी पडू शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कपूर हवेलीचे संग्रहालयात रूपांतर करण्याच्या उद्देशाने या प्रांताच्या पुरातत्त्व खात्याने प्रयत्न केले, पण इस्रार याची त्यास तयारी नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारणामुळे इस्रार यांचे कपुर हवेली पाडण्याचे आधीचे तीन-चार प्रयत्न अपयशी ठरले. या वास्तूची किंमत पाच कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यावरून सरकारशी कोणतेही मतभेद नाहीत, असा दावा करून इस्रार म्हणाले की, माझ्या गरजा भागविण्यासाठी पुरेसा पैसा आहे. मी सर्वांत मोठ्या सराफ बाजारात आठवड्याला १२० ते १६० किलो सोने पुरवितो. हवेली पाडायची आणि भव्य व्यापारी संकुल उभारायचे हेच मला करायचे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परराष्ट्र मंत्र्यांचे आश्वासन...
कपूर हवेलीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संग्रहालय उभारण्याचे आश्वासन पाक परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी २०१८ मध्ये ऋषी कपूर यांना दिले होते. तशी विनंती ऋषी कपूर यांनी केली होती. मात्र खरेदीच्या किमतीवरून इस्रार यांच्याशी सरकारचे मतभेद झाले. तसेच प्रांताकडे पुरेसा निधीही नसल्याच्या कारणावरून यावर पाणी पडल्याची चिन्हे आहेत.

Edited by : Kalyan Bhalerao


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: owner insists on demolishing the Peshawar Kapoor palace