अलास्का / लंडन : 3,000 हून अधिक नव्या वाहनांची वाहतूक करणारे मॉर्निंग मिडास (Morning Midas) हे मालवाहू जहाज पॅसिफिक महासागरात (Pacific Ocean) बुडाल्याची घटना समोर आली आहे. यातील सुमारे 800 वाहने इलेक्ट्रिक (EVs) होती. अलास्काच्या अल्युशियन बेटांजवळ ही घटना घडलीये. यामध्ये अब्जावधी डाॅलर्सचं नुकसान झाल्याची माहिती आहे.